Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस! पहा हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain News : राज्यातील काही भागातच पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण, यंदाच्या पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता

मुंबई शहर-उपनगरात पावसाचा अंदाज काय?

विदर्भासह मराठवाड्यात कसा असणार पावसाचा जोर?
Maharashtra Rain News : राज्यातील काही भागातच पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण, यंदाच्या पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आजचा (13 ऑगस्ट) हवामान विभागाचा (IMD) जाणून घेऊया. माहितीनुसार, आज राज्याच्या काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra mumbai pune Weather live news Update today 13 august 2024 Heavy rain with gusty winds in these parts of the state)
राज्यात बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. तर मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज आहे. नाशिक आणि पुण्यातही आज मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा : Chhagan Bhujbal मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? भुजबळांनीच सुचवला पर्याय
मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्रासह कोकणात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पाऊस उघडल्याचे दिसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांत कमी झाला असला तरी काही ठिकाणी आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई शहर-उपनगरात पावसाचा अंदाज काय?
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडेल.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 27°C च्या आसपास असेल.