Maharashtra SSC Result 2024: बेस्ट ऑफ लक! दहावीचा निकाल जाहीर, अशी मिळवा मार्कशीट

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थ्यांना कशी मिळवता येणार मार्कशीट?

point

विभागनिहाय निकालाची टक्केवारी

महाराष्ट्र SSC निकाल 2024 : Maharashtra SSC Result 2024 Declare : शालेय जीवनाचा टप्पा ओलांडून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकण्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावीचा निकाल.... 12 वीचा निकाल लागल्यानंतर 10 वीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण दहावीचा निकाल आज (27 मे 2024) जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. (maharashtra ssc result 2024 10th result declared to get marksheet students should follow this steps

दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठा धमाका केला आहे. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के लागला. कोकण विभागाने 99.01 टक्क्यांसह नेहमीप्रमाणे पहिली बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा निकाल 94.73 टक्क्यांसह सर्वात कमी लागला आहे. निकालाबाबत मुलांसह पालकांना उत्सुकता लागलेली आहे. तर काहींची धाकधूक वाढली आहे. 

हेही वाचा : Maharashtra SSC Result 2024 : मुलींचाच डंका! निकालात मुले किती टक्क्यांनी मागे?

अधिकृत माहितीनुसार, दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन वेबसाइटवरून तर ऑफलाइन SMS द्वारे पाहता येईल. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागातील एकूण  15,60,154 विद्यार्थ्यांनी दहावीचा परीक्षा दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांना कशी मिळवता येणार मार्कशीट?

  • महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in वेबसाइटला भेट द्या. 
  • वेबसाईटवर दहावीच्या निकालाची लिंक दिसेल, तिथे क्लिक करा. 
  • लॉगइनसाठी आवश्यक माहिती सांगित्याप्रमाणे भरा. 
  • नोंदणीसाठी परीक्षा क्रमांक आणि आईचं नाव अशा डिटेल्स त्यामध्ये भरा. 
  •  माहितीची पूर्तता केल्यानंतर पुढच्या क्षणाला तुमच्यासमोर निकाल Load होईल.
  •  निकाल दिसल्यानंतर तो पीडीएफ फाईलमध्ये डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा. 

 

हेही वाचा : Pune Accident Updates : पुण्यात खळबळ! 'ससून'मधील मोठ्या डॉक्टरला अटक

निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. 94.56 टक्के मुलं उत्तीर्ण झाली असून, 97 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

ADVERTISEMENT

हेही वाचा : SSC Result 2024: 10वीचा निकाल मोबाइल आणि वेबसाइटवर कसा पाहायचा?

विभागनिहाय निकालाची टक्केवारी

  • कोकण : 99.01 टक्के
  • कोल्हापूर : 97.45 टक्के  
  • पुणे : 96.44 टक्के 
  • मुंबई : 95.83 टक्के 
  • अमरावती : 95.58 टक्के 
  • नाशिक : 95.28 टक्के 
  • लातूर : 95.27 टक्के 
  • छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के 
  • नागपूर : 94.73 टक्के 

  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT