Maharashtra Weather : थंडीचा महिना, धुक्याची चादर अन् पावसाचं संकट! हवामानाचा अंदाज काय?

मुंबई तक

Maharashtra Weather IMD Alert Report : राज्यात काही ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढले आहे. तर, काही भागात अजूनही अवकाळी पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढले

point

‘या’ जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा..

point

मुंबई आणि कोकणात किमान आणि कमाल तापमानात कोणतीही घट नाही

Maharashtra Weather IMD Alert Report : राज्यात काही ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढले आहे. तर, काही भागात अजूनही अवकाळी पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक थंडीची वाट पाहत होते. पण यंदा उशिराने थंडी सुरू झाली. अशावेळी अजूनही काही भागांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (maharashtra weather forecast update Today 18 november 2024 winter season minimum temperature IMD report mumbai pune kolhapur nagpur)

मुंबई आणि कोकणात किमान आणि कमाल तापमानात कोणतीही घट दिसत नाहीये. मुंबई आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवस राज्यात समिश्र वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा : Pankaja Munde : "भाजपने बाहेरुन निवडणुकीसाठी 90 हजार लोक आणलेत, इथला ऑक्सिजन कमी झाला"

‘या’ जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा..

हवामान विभागाने आठ जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर, रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp