Maharashtra Weather : मुंबईसह काही ठिकाणी पावसाची स्थिती, IMD विभागाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात गेली तीन दिवसांपासून पावसाने गैरहजेरी लावलेली आहे. काही ठिकाणी कोरडं तर काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज दर्शवला होता. अशातच राज्यात पुन्हा काही भागांत अंगाची लाहीलाही होताना दिसते. अशातच जाणून घ्या 14 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काही ठिकाणी कोरडं हवामानाचा अंदाज
14 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात गेली तीन दिवसांपासून पावसाने गैरहजेरी लावलेली आहे. काही ठिकाणी कोरडं तर काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज दर्शवला होता. अशातच राज्यात पुन्हा काही भागांत अंगाची लाहीलाही होताना दिसते. दरम्यान जाणून घ्या 14 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : पुरोगामी कोल्हापुरात सुनेचा छळ, बारशापूर्वी आईनं गळफास घेत संपवलं जीवन
कोकण
कोकण विभागात पालघर आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर रत्नागिरी या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलक्या पावसाचा अंदाज आहे.










