Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही, सूर्यदेव आग ओकणार, IMD चा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. तापमानाचा पारा पुन्हा चढलेला दिसून येतोय. काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामानाचा अंदाज आहे. तर काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट जारी केला आहे. अशातच जाणून घेऊयात 13 एप्रिल 2026 रोजी हवामानाचा एकूण अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल
तापमानाचा पारा पुन्हा चढलेला दिसून येतोय
Maharashtra Weather : राज्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. तापमानाचा पारा पुन्हा चढलेला दिसून येतोय. काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामानाचा अंदाज आहे. तर काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट जारी केला आहे. अशातच जाणून घेऊयात 13 एप्रिल 2026 रोजी हवामानाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : 'माझी नाहीस तर कोणाचीच नाहीस', तरुणीने लग्नास दिला नकार, तरुणाने पीडितेला HIV चं इंजेक्शन दिलं, पुढे भयंकर...
कोकण
कोकण विभागात हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी उकाड्यात वाढ होईल असा हवामानाचा अंदाज जारी केला. दुपारी उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ जाणवेल अशी शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली, साताऱ्यासह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका अधिक तीव्र जाणवणार आहे. सकाळी हलक्या स्वरुपाचा गारवा जाणवला तरीही दुपारनंतर झपाट्याने तापमानात वाढ होईल. यापैकी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना पुढील काही तास उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी केला.