Maharashtra Weather: मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पाऊस; IMD चा सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather Forecast : काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुढील 2 दिवस पावसचा जोर राहणार कायम
मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग
Maharashtra Weather Forecast : काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात रेड, कुठे ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update Heavy rain today in these districts including Mumbai IMD's alert warning)
ADVERTISEMENT
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातही घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : माढ्यात मोहितेंनंतर पवारांचा दुसरा डाव! अजितदादांना धक्का, शिंदेंना घरातूनच चॅलेंज?
तर, कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं कोल्हापुरात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर आणि नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा : Pimpari Chinchwad Video : बाहुली घेऊन खेळत होती, अंगावर लोखंडी गेट पडला अन्...चिमुकलीसोबत काय घडलं?
पुढील 2 दिवस पावसचा जोर राहणार कायम
पुढील 2 दिवस म्हणजेच 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असेल.
हेही वाचा : Uddhav Thackeray : विधानसभेआधीच महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरेंच्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग
मुंबईशहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि भंडारा अशा एकूण 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग होण्याची शक्यता हवामान विभाग आणि तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT