Miss Universe India 2024: गुजरातची 18 वर्षीय सुंदरी बनली 'मिस युनिव्हर्स इंडिया'! कोण आहे रिया सिंघा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गुजरातच्या रिया सिंघा या 18 वर्षीय सुंदरीने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज

point

रिया आता जागतिक स्तरावर करणार भारताचे प्रतिनिधित्व

point

कोण आहे भारतीय सुंदरी रिया सिंघा?

Rhea Singha crowned Miss Universe India 2024 : मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा (Miss Universe India 2024) ताज यंदा गुजरातच्या रिया सिंघा या 18 वर्षीय सुंदरीने जिंकला आहे. आता रिया जागतिक स्तरावर मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातील 50 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. पण या सगळ्यांना मागे टाकून भारतीय सुंदरी रियाने बाजी मारली आहे. आता येत्या काही दिवसांत रिया जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. (Miss Universe India 2024 gujrat 18 years Rhea Singha who own the crown)

ADVERTISEMENT

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ग्रँड फिनाले खूपच रोमांचक होता. यामध्ये रिया विजेती ठरली आणि प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावले. 2015 ची मिस युनिव्हर्स इंडिया ठरलेल्या उर्वशी रौतेलाने रियाच्या डोक्यावर क्राउन घातला. रियाने आपल्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली याचा तिच्या कुटुंबाला प्रचंड अभिमान आहे.

हेही वाचा : Gold Price: सोन्याच्या किंमतींचा बाजारात नुसता धुरळा! बघूनच उडेल झोप; 1 तोळ्याचा भाव किती?

 जजेसच्या पॅनेलमध्ये निखिल आनंद, अभिनेत्री आणि माजी ब्युटी क्वीन उर्वशी रौतेला, व्हिएतनामी स्टार गुयेन क्विन, फॅशन फोटोग्राफर रायन फर्नांडिस आणि उद्योगपती राजीव श्रीवास्तव यांचा समावेश होता. यावेळी अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2015 उर्वशी रौतेला हिने आपले विचार शेअर केले आणि आशा व्यक्त केली की "भारत या वर्षी पुन्हा मिस युनिव्हर्सचा ताज जिंकेल."

हे वाचलं का?

प्रांजल प्रियाला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 स्पर्धेत प्रथम रनर-अप म्हणून घोषित करण्यात आले. त्याचवेळी छवी दुसरी रनर-अप ठरली. या दोघींव्यतिरिक्त सुष्मिता रॉय आणि रुफुझानो व्हिसो या तिसऱ्या आणि चौथ्या रनर-अप ठरल्या.

कोण आहे भारतीय सुंदरी रिया सिंघा?

मिस यूनिव्हर्स 2024 चा ताज जिंकल्यानंतर रिया सिंघा प्रतिक्रिया देत म्हणाली, "आज हा खिताब पटकावल्यानंतर मी आपली आभारी आहे. हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे या खिताबासाठी मी नक्कीच पात्र आहे. तसंच याआधीच्या विजेत्यांमुळे मला प्रेरणा मिळाली." आता रिया मिस यूनिव्हर्स 2024 साठी भारताचं प्रतिनिधित्व करण्यास मी सज्ज आहे. मेक्सिको येथे मिस यूनिव्हर्स स्पर्धा पार पडणार आहे. रियाने 51 फायनलिस्टला मागे टाकत खिताब मिळवला. 

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra Weather: सावधान! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा IMD रिपोर्ट

या स्पर्धेत इतर स्पर्धकांनीही प्रभावी कामगिरी केली. 18 वर्षांची रिया मूळची गुजरातची आहे. आता ती मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. रियाच्या इन्स्टा बायोनुसार, ती देखील एक अभिनेत्री आहे. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 39 हजार फॉलोअर्स आहेत.

ADVERTISEMENT

या वर्षाच्या अखेरीस मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2024 मध्ये रिया सिंघा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. रिया ही अहमदाबाद, गुजरातची आहे. तिने परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. इतकेच नाही तर रिया ही एक फॅशन डिझायनर देखील आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT