Sanjay Gaikwad: शिंदे गटाच्या आमदाराने तरूणाला लाठीने फोडून काढलं, दादागिरीच्या व्हिडिओनंतर संताप

मुंबई तक

ADVERTISEMENT

आमदार संजय गायकवाड यांनी तरूणाला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे या मिरवणुकीत पोलीस देखील उपस्थित होते. मात्र पोलिसांनी ही मारहाण रोखण्याऐवजी आमदाराच्या मारहाणीच्या घटनेला समर्थन दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
mla sanjay gaikwad beating young boy during shiv jayanti rally budhana video viral shocking story
social share
google news

MLA Sanjay Gaikwad beating young boy, Video Viral : जका खान, बुलढाणा,  शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काहीच दिवसांपुर्वी वाघाची शिकार करून त्याच दात गळ्यात घातल्याप्रकरणी वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी एका तरूणाला बेदम (Boy Beaten) मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीसांसमोरच संजय गायकवाड यांनी तरूणाला पोलिसांच्या लाठीने बेदम मारहाण केली आहे. या संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर आमदाराच्या कृतीवर नागरीकांकडून संताप व्यक्त होतं आहे. (mla sanjay gaikwad beating young boy during shiv jayanti rally budhana video viral shocking story) 

बुलढाण्यात गेल्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत ही घटना घडली आहे. या व्हिडिओत आमदार संजय गायकवाड यांनी तरूणाला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे या मिरवणुकीत पोलीस देखील उपस्थित होते. मात्र पोलिसांनी ही मारहाण रोखण्याऐवजी आमदाराच्या मारहाणीच्या घटनेला समर्थन दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कारण एका तरूणाला पोलिसांनीच धरले असताना आमदार संजय गायकवाड यांनी पोलीसाची काठीने त्याला बेदम मारहाण केला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान पोलीस त्यांचे कर्तव्य निभावत असताना लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेऊन अशाप्रकारची दादागिरी केल्याबद्दल नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

हे ही वाचा : Gautam Gambhir : गौतम गंभीर राजकारणातून 'आऊट'

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एक्स या सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट करून सरकारला लक्ष्य केलं होतं. किती बोलायचं? किती प्रकरणं रोज दाखवायची? या व्हिडिओत तरुणाला अमानुष मारहाण करणारा व्यक्ती हा काही मामुली गुंड नाही. मारहाण करणारा व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाड आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.तसेच हवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाभुक्क्या मारून सुरू असलेलं महायुतीच विकासाच राजकारण आता जनतेला लाठ्या काठ्यानी झोडपून काढण्यापर्यंत पोहचलं, अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली. तसेच हीच काय ती मोदी की गॅरंटी, असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणात अद्याप तरी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. मात्र पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यास संपूर्ण शहानिशा आणि कायदेशीर बाबींची तपासणी करून निश्चितच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे बुलढाण्याचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : अजितदादा माझं गृह खातं मागतील, पण मी त्यांना.. : फडणवीस

    follow whatsapp

    ADVERTISEMENT