‘हे वेळीच थांबवलं पाहिजे’, राज ठाकरेंनी गणेश मंडळांना झापले, सरकारला…
Raj Thackeray Latest tweet in Marathi : गणेशोत्सवात मोठ्या आवाजातील गाणी, डीजे, गोंगाट करत डान्स… या सगळ्या प्रकारावरून राज ठाकरेंनी गणेश मंडळांना चांगलंच सुनावलं आहे.
ADVERTISEMENT

Raj Thackeray Latest Tweet : महाराष्ट्रात गणेशोत्सव आनंदात झाला. विसर्जनही धडाक्यात झालं. पण, या उत्सवाला गालबोट लावणाऱ्या घटना राज्यात घडल्या. यावर बोट ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गणेश मंडळांचे कान पिळले. राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहिलीये. त्यात राज यांनी सगळी भूमिका मांडली असून, राज्य सरकारलाही पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी
सस्नेह जय महाराष्ट्र
महाराष्ट्रातला गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, आणि तो पार पडावा ह्यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणा राबल्या त्यांचं मनापासून अभिनंदन. नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरातील सण, सणाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी जे काम केलं ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
धर्मातील उन्मादावर मौन
मी आज ज्यावर बोलतोय त्याची पार्श्वभूमी नुकताच पार पडलेला महाराष्ट्रातील महाउत्सव आणि त्याचं बदलत चाललेलं स्वरूप हे आहे. गणपती असो, दहीहंडी असो की नवरात्रोत्सव असो, रामजन्माचा उत्सव असो की इतर हिंदू देवतांचे उत्सव असोत, ते ह्या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत. आणि त्यावर सरकारांनी जरी निर्बंध आणले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळेस सरकारशी संघर्ष केला आहे आणि ह्यापुढे पण गरज पडली तर करत राहू.