Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी पुन्हा संधी! फक्त 'या' एका अटीवरच मिळणार मुदतवाढ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात येतेय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'या' एका अटीवरच मिळणार मुदतवाढ
आधार कार्ड खात्याशी करा लिंक
योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती?
Mukhymantri Mazi ladki bahin yojana : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या जातात. अशाचप्रकारे भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील सरकारही आपल्या नागरिकांसाठी विविध योजना सुरु करतात. महाराष्ट्र सरकारने यावर्षी राज्यातील महिलांसाठी एक मोठी स्कीम सुरु केली आहे. त्या योजनेचं नाव लाडकी बहीण योजना असं आहे. ही योजना सध्या तुफान चर्चेत आहे. याअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात 1500 रूपये प्रतिमहिना असे मिळून जुलैपासून अॅडव्हान्स नोव्हेंबरपर्यंतचे 5 हफ्ते जमा झाले आहेत. पण काही महिला या योजनेपासून अजूनही वंचित आहेत त्यांच्यासाठी ही खास बातमी आहे. कारण आता अर्जाच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana apply form last date extended by maharashtra government)
ADVERTISEMENT
'या' एका अटीवरच मिळणार मुदतवाढ
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात येतेय. महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत दिली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती.
हेही वाचा : Firing on Baba Siddique : सलमान खानचे खास असल्याची किंमत बाबा सिद्दीकींना चुकवावी लागली?
पण यासाठी एक अट आहे. मुदतवाढीनंतर महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही. अंगणवाडी सेविकामार्फतच हे अर्ज भरावे लागणार आहेत.
हे वाचलं का?
लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी याआधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून 31 ऑगस्ट 2024 करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून 30 सप्टेंबर केली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवण्यात आली असून महिलांना 15 ऑक्टोबरपर्यंत अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज भरता येणार आहेत.
आधार कार्ड खात्याशी करा लिंक
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी आधार कार्डला खात्याशी लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या महिलांच्या खात्यात आधार कार्ड लिंक नसेल, तर त्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही. यासाठी तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करणे महत्त्वाचे आहे.
ADVERTISEMENT
योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड
- अधिवास/ जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराने हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT