Mazi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजने'चा पहिला हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा; किती मिळणार पैसे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'लाडकी बहीण योजने'चा पहिला हप्ता कोणत्या तारखेला होणार जमा?

point

लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्तात किती पैसे मिळणार?

Mazi Ladki Bahin Yojana Installment : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून महिलांचा या योजनेला उत्सफूर्द प्रतिसाद मिळत आहे. तसेच, 31 ऑगस्टपर्यंत महिलांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यात ही योजना मदत करेल. राज्य सरकारकडून देण्यात येणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आता या सर्वात अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की पहिला हफ्ता किती रूपयांचा मिळणार आहे? (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana first installment details Deposit to be made on this date)

हेही वाचा : Vinesh Phogat Retirement: 'आई... मी हरले'; ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची मोठी घोषणा!

माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहेत. या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच 3 हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. 

हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा! पहा IMD चा अंदाज

राज्य सरकारने 17 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी योजनेसाठी  ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे . त्यापैकी 1 कोटी 27 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : MNS: भाजपसोबत युती नाहीच, राज ठाकरेंनी चौथा उमेदवार केला जाहीर!

तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांची आकडेवारी समोर येत आहेत. त्यामध्ये, महिला भगिनींचे मंजूर अर्ज, प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहेत. तर, प्रलिंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करुन ते मंजूर केले जाणार असल्याची माहिती आहे.


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT