Maratha Reservation : मनोज जरांगेंविरूद्ध नारायण राणेंनी थोपटले दंड, दिलं ओपन चँलेंज

प्रशांत गोमाणे

Narayan Rane Criticize Manoj Jarange Patil, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच खालावली आहे. आज सकाळीच त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. या सर्व घडामोडीनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली आहे.

ADVERTISEMENT

narayan rane criticize manoj jarange patil maratha reservation maharashtra politics
जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, तो काही बडबड करतोय, अशी टीका नारायण राणे यांनी मनोज जरांगेंवर केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जरांगेना मी मराठयांचा नेता मानत नाही

point

जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झालाय

point

नारायण राणे यांची मनोज जरांगेंवर टीका

Narayan Rane Criticize Manoj Jarange Patil, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच खालावली आहे. आज सकाळीच त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. या सर्व घडामोडीनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली आहे. जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, तो काही बडबड करतोय, अशी टीका नारायण राणे यांनी मनोज जरांगेंवर केली आहे. (narayan rane criticize manoj jarange patil maratha reservation maharashtra politics)

नारायण राणे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून नारायण राणे यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. नेमकं ते ट्विटमध्ये काय म्हणालेत, ते जाणून घेऊयात.

नारायण राणेंचे ट्विट जशास तसं

मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात  फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !

 

दरम्यान जरांगे यांनी आझाद मैदानातील आंदोलनानंतर पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती मात्र साथ देताना दिसत नाही. तिसऱ्यांदा उपोषण करत असलेल्या जरांगे यांची प्रकृती पाचव्या दिवशी कमालीची खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त यायला लागल्याने उपोषण स्थळी बसलेले नागरिक भावूक झाले आहेत.  जरांगे यांची ढासळलेली प्रकृती बघून उपस्थित असलेल्या महिला रडत आहेत. तर लोकही भावूक होत आहे. लोकांकडून पाणी पिण्याची विनंती जरांगेंना केली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp