Cyclone Biparjoy: धडकी भरवणारं चक्रीवादळ घोंघावतंय, वादळाच्या 24 मोठ्या अपडेट
Cyclone Biparjoy Update: चक्रीवादळ बिपरजॉयचा सामना करण्यासाठी भारतातील NDRF आणि पाकिस्तानमध्ये लष्कर तैनात करण्यात आलं आहे. वाचा याच चक्रीवादळासंबंधीचे 24 मोठे अपडेट.
ADVERTISEMENT
Cyclone Biparjoy: मुंबई: अरबी समुद्रातील (Arabian Sea) बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) वेगाने किनारी भागाकडे सरकत आहे. त्याचा परिणाम अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. केरळ, कर्नाटक आणि गोव्यातून पुढे गेल्यानंतर गुजरात (Gujarat) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) या वादळाचा प्रभाव दिसून येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा करून चक्रीवादळाची माहिती घेतली. या आपत्तीच्या वेळी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. याशिवाय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांचीही बैठक घेतली.
ADVERTISEMENT
हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, ईशान्य दिशेने गुजरात किनारपट्टीकडे वळण्यापूर्वी वादळाचा वेग थोडा कमी झाला आहे. पूर्वी त्याची गती 90 नॉट (167 किमी प्रतितास) होती, जी 85 नॉट्स (सुमारे 157 किमी प्रतितास) पर्यंत खाली आली आहे. हे चक्रीवादळ सुमारे 65 नॉट (सुमारे 120 किमी प्रति तास) वेगाने किनारपट्टीवर धडकू शकते आणि नंतर लँडफॉल केल्यानंतर ते कमकुवत होईल.
Cyclone Warning for Saurashtra and Kutch Coasts: Orange Message. VSCS BIPARJOY at 1130IST of today about 290km WSW of Devbhumi Dwarka, 320km WSW of Porbandar, 320km SW of Jakhau Port, 330km SW of Naliya. To cross near Jakhau Port (Gujarat) AROUND evening of 15th June as VSCS. pic.twitter.com/jKpCJw1g1b
— India Meteorological Department (@Indiametdept) June 13, 2023
हे वाचलं का?
बिपरजॉय चक्रीवादळाबाबतचे 24 मोठे अपडेट
> बिपरजॉय चक्रीवादळामुळे आतापर्यंत अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
>कच्छ, जामनगर आणि द्वारका येथे एसडीआरएफच्या दोन तुकड्या, जुनागढ, पोरबंदर, गीर सोमनाथ, मोरबी, पाटण आणि बनासकांठा येथे प्रत्येकी एक टीम तैनात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
> कच्छमध्ये एनडीआरएफच्या चार, देवभूमी द्वारकामध्ये तीन, राजकोटमध्ये तीन, जामनगर, जुनागढ, पोरबंदर, गिरसोमनाथ, मोरबी आणि वलसाडमध्ये दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT
>भारत सरकार, गुजरात सरकार, भारतीय हवाई दल, नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह सर्व एजन्सी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
हे ही वाचा>> ‘BJP ला आज कळलं असेल ‘या’ माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा’, जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?
> जुनागड जिल्ह्यात 500, कच्छमध्ये 6786, जामनगरमध्ये 1500, पोरबंदरमध्ये 546, द्वारकामध्ये 4820, गीर सोमनाथमध्ये 408, मोरबीमध्ये 2000 आणि राजकोटमधील 4031 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
> चक्रीवादळ बिपरजॉयमुळे, हवामान खात्याने गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ‘बिपरजॉय’ गुजरातच्या किनार्याकडे सरकला असून, कच्छ जिल्ह्यातील नलिया शहरात हलका पाऊस झाला आहे.
> भारतीय हवामान विभागाचे म्हणणे आहे की, गुजरातमधील जाखाऊ बंदराजवळ 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत धडकल्यानंतर ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ कमकुवत होईल.
> गुजरातच्या कच्छमधून आतापर्यंत 8000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्याचवेळी दीड ते दोन लाख लहान-मोठे प्राणी उंच ठिकाणी पोहोचले आहेत.
> गुजरातमधील ओखाजवळील द्वारका किनाऱ्यावर जॅक-अप रिग ‘की सिंगापूर’ मधील सर्व 50 कर्मचाऱ्यांना आज सकाळी भारतीय तटरक्षक दलाच्या ALH ध्रुव हेलिकॉप्टरने बाहेर काढले. गुजरातमधील नवसारी येथे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
> गुजरात सरकारने राज्यातील सौराष्ट्र भागातील किनारी कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका आणि जुनागढ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवभूमी द्वारका, जामनगर आणि जुनागड जिल्ह्यातील शाळा बंद राहतील. त्याच वेळी, कच्छमधील शाळा 12 जून ते 15 जून 2023 पर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
> ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर लाटा उसळत आहेत, ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी समुद्रात जाऊ नये म्हणून समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
> चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये कांडला बंदर बंद करण्यात आले असून, त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. कांडला बंदरातून जाणारे शेकडो ट्रक गांधीधाममध्ये उभे करण्यात आले आहेत.
> हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज मुंबईत अंशत: ढगाळ वातावरण असेल आणि हलका ते मध्यम पाऊस/ मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.
हे ही वाचा>> Mira Road : तुकडे कुकरमध्ये शिजवणे, कुत्र्यांना टाकणे; हा राक्षसीपणा येतो कुठून?
> चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता गुजरातमधील कांडला रिकामे करण्यात आले आहे. समुद्र किनारा परिसरातील 2 किमी परिघातील गावे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
> बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम वाहतुकीवरही दिसून येत आहे. बिपरजॉयमुळे पश्चिम रेल्वेच्या 137 गाड्या प्रभावित झाल्या आहेत. आजपासून 17 जूनपर्यंत, काही गाड्या रेल्वेकडून रद्द केल्या जात आहेत आणि काही शॉर्ट-टर्मिनेटेड/ओरिजिनेटेड आहेत.
> चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत किनारपट्टी भागात गस्त घालण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या डझनभर तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
> गुजरातच्या गीर जंगलातील सिंहांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून सिंहांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये म्हणून 300 ट्रेकर्स सिंहांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
> गिरनार रोपवे सलग चौथ्या दिवशीही बंद राहिला. रोप वे आणखी तीन दिवस बंद राहणार असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे स्थलांतरितांना गिरनार पर्वतावर न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
> बिपरजॉय चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जामनगरच्या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाची जीर्ण इमारत जामनगर महापालिकेने पाडली. जामनगरचे 150 वर्षे जुने रेल्वे स्थानक अनेक वर्षांपासून बंद असले तरी ऐतिहासिक वास्तू म्हणून अस्तित्वात होते.
> याशिवाय मोरबीतील सर्व सिरॅमिक प्लांट बंद करण्यात आले आहेत. मोरबी सिरेमिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने सर्व युनिट्स बंद ठेवल्याची माहिती दिली आहे.
> IMD ने 15 जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळाचा सर्वात मोठा धोका घोषित केला आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांना घरात आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे झाडे, विजेचे खांब, सेलफोनचे टॉवर उन्मळून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज आणि दूरसंचारात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पिकांचेही नुकसान होणार आहे.
> हवामान खात्यानुसार, 14 तारखेच्या सकाळपर्यंत चक्रीवादळ बिपरजॉय उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकून सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडून 15 जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान जखाऊ बंदराजवळ (गुजरात) पाकिस्तान किनारपट्टी ओलांडून जाईल.
> पाकिस्तानच्या हवामान खात्याने कराचीमध्ये ढगफुटीसारख्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर सिंधमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. येथे लष्कर तैनात करण्यात आले असून सखल भागात राहणाऱ्या सुमारे 80 हजार लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
> Biporjoy म्हणजे आपत्ती. बिपोरजॉय हे बांगलादेशचे दिलेले नाव आहे. खरे तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या सर्व चक्रीवादळांना या भागातील देशांनी आळीपाळीने नावे दिली आहेत, जी आधीच ठरलेली असतात. ही यंत्रणा 2004 पासून सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT