Netflix चा मोठा निर्णय! मित्रा-मैत्रिणींसोबत लॉगिन-पासवर्ड शेअर करत असाल तर…

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Netflix's Big Announcement of Login-password sharing is disabled
Netflix's Big Announcement of Login-password sharing is disabled
social share
google news

Netflix Password Sharing : नेटफ्लिक्स अनेक दिवसांपासून पासवर्ड शेअरिंगला विरोध करत आहे. कंपनीने अनेक क्षेत्रांमध्ये पासवर्ड शेअर करणे बंद केले आहे किंवा त्यावर शुल्क लावण्यात आले आहे. जर तुम्हालाही नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर करायचा असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल. 20 जुलैपासून कंपनी भारतातही हा नियम लागू करत आहे. (Netflix’s Big Announcement of Login-password sharing is disabled)

ADVERTISEMENT

यामुळे भारतातील Netflix वापरकर्ते यापुढे पासवर्ड शेअर करू शकणार नाहीत. कंपनीने पासवर्ड शेअरिंगला महसूलीतील नुकसान मानलं आहे. 2023 च्या सुरुवातीला कंपनीने हा निर्णय अमेरिकेतही घेतला होता. यानंतर, कंपनीने मे महिन्यात ही पॉलिसी 100 हून अधिक देशांमध्ये विस्तारली.

Covid Scam: संजय राऊतांना मोठा धक्का, ईडीकडून सुजित पाटकरांना अटक

यूजर्संना नेटफ्लिक्स कंपनीकडून ईमेल जारी!

भारतात नेटफ्लिक्स यूजर्संना लोकांना सुरुवातीला ईमेल मिळेल. यामध्ये युजर्सना अकाउंटच्या वापराबाबत काही स्टेप्सची माहिती दिली जाईल. नेटफ्लिक्सने गुरुवारी (20 जुलै) रोजी सकाळी नवीन रिस्ट्रिक्शनची माहिती दिली आहे. अपडेटनुसार, नेटफ्लिक्स सुरुवातीला एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर एकच अकाउंट वापरणाऱ्या यूजर्सना ईमेल पाठवेल.

हे वाचलं का?

या ईमेलमध्ये फक्त एक कुटुंब एकच अकाउंट वापरू शकते असे सांगण्यात येईल. कुटुंबाबाहेरील व्यक्तीला त्याचे प्रोफाईल दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे लागेल. कंपनी या ईमेलमध्ये डिव्हाइस ट्रॅक करण्यासाठी एक लिंक देईल. याला भेट देऊन, तुम्ही ज्या डिव्हाइसेसमध्ये तुमचे अकाउंट लॉग इन केले आहे ते ट्रॅक करू शकता.

तुमचे अकाउंट अज्ञात डिव्हाइसवर लॉग इन केले असल्यास, तुम्ही ते लॉगआउट देखील करू शकता. याशिवाय तुम्हाला पासवर्ड बदलण्याचाही पर्याय आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, जर बाहेरील कोणी तुमचे अकाउंट वापरत असेल तर तो त्याचे प्रोफाईल दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो.

ADVERTISEMENT

Irshalwadi Landslide : ‘गिरीशजी, सीएम आलेत म्हणून…’, अजित पवारांनी सुनावलं

भारतात, तुम्ही एकाच घरातील वेगवेगळ्या डिव्हाइसवर समान Netflix अकाउंट वापरतात. याचा फायदा घेत लोक एकच अकाउंट वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करत होते. उदाहरणार्थ, मित्रांचा एक ग्रुप Netflix चे सब्सस्क्रिप्शन घेत नंतर बिल आपापसात वाटून घेत होते, परंतु आता तसं करता येणार नाही.

ADVERTISEMENT

Netflix यूजर्सना कसं रोखणार?

यूजर्सना रोखण्यासाठी नेटफ्लिक्स अनेक प्रकारचे निर्बंध (Restrictions) लागू करू शकतो. यामुळे, यूजर्सना एकच अकाउंट वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरणे कठीण होईल. यासाठी कंपनी व्हेरिफिकेशन कोड आणि प्रायमरी लोकेशनवर वाय-फाय अॅक्सेस यांसारखे अनेक फिचर्स जोडू शकते.

यूजर्सना दर 7 दिवसांनी नेटफ्लिक्समध्ये अॅक्सेससाठी एक व्हेरिफिकेशन कोड द्यावा लागेल. याशिवाय, दर 31 दिवसांनी तुम्हाला तुमचे डिव्हाइस प्रायमरी लोकेशनच्या वाय-फाय किंवा इंटरनेटशी कनेक्ट करावे लागेल.

Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!

Netflix सबस्क्रिप्शन प्लान कसा असणार?

भारतात Netflix सबस्क्रिप्शनचे 149 रुपये मासिक शुल्क आहे. ही एक मोबाईल योजना आहे. म्हणजेच, तुम्ही फक्त मोबाइल फोनवर नेटफ्लिक्स अॅक्सेस करू शकाल. दुसरीकडे, दुसरा प्लॅन 649 रुपयांचा आहे, जो मासिक प्रीमियम प्लॅन आहे. यामध्ये युजर्सना अल्ट्रा एचडी कंटेंट मिळेल, ज्याचे तुम्हाला चार डिव्हाइसवर अॅक्सेस मिळते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT