Bank Officer पदांसाठी मोठी भरती! 'या' तारखेपर्यंत न विसरता अर्ज करा..तगडा पगार अन्..
इंडियन ओव्हरसिझ बँक (IOB) कडून लोकल बँक ऑफिसर (LBO) च्या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी IOB च्या iob.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

लोकल बँक ऑफिसर (LBO) च्या पदांसाठी मोठी भरती

लोकल बँक ऑफिसर (LBO) च्या पदासाठी किती वेतन मिळेल?
Govt Bank recruitment: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी बरेच तरुण प्रयत्न करत असतात. यामध्ये फक्त चांगला पगारच नाही तर सुरक्षा, सन्मान आणि सुविधा मिळतात. सरकारी बँकेतील नोकरी खूप सुरक्षित म्हणजेच सेक्योर असते. खरंतर, पब्लिक सेक्टरमधील नोकऱ्यांमध्ये नोकरी जाण्याचा धोकाच नसतो, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. यामध्ये चांगल्या पगारासोबतच वेगवेगळे भत्ते सुद्धा दिले जातात. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो.
इंडियन ओव्हरसिझ बँकेत पदांसाठी भरती
जर तुम्हीसुद्धा सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडियन ओव्हरसिझ बँक (IOB) कडून लोकल बँक ऑफिसर (LBO) च्या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी IOB च्या iob.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीअंतर्गत तब्बल 400 जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 आहे.
हे ही वाचा: 'त्या' व्हायरल Video मुळे ज्योती मल्होत्राच्या अडचणी वाढल्या! पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याचं कनेक्शन आलं समोर
किती मिळेल पगार
इंडियन ओव्हरसिझ बँकेत लोकल बँक ऑफिसर (LBO) या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 85,920 रुपये मासिक वेतन मिळेल. याव्यतिरिक्त त्यांना बऱ्याच सुविधा मिळतील. जसे की, महागाई भत्ता (DA) घरभाडे भत्ता (HRA), शहर भरपाई भत्ता (CCA) आणि बँकेच्या नियमांनुसार बाकीचे भत्ते मिळतील.
हे ही वाचा: पूजाऱ्याशी ऑनलाईन ओळख झाली! थेट पाकिस्तानात पोहोचली..नागपूरच्या महिलेचं काय आहे कनेक्शन?
अर्ज करण्यासाठी वयोवर्यादा
इंडियन ओव्हरसिझ बँकेतील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. इंडियन ओव्हरसीझ बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. तसेच, नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाईल. याशिवाय, उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.