Govt Job: इंजीनिअर्स उमेदवारांनी मिळवा सरकारी नोकरी! 'राइट्स'च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अर्ज...
राइट्स लिमिटेड म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्विस (Rail India Technical and Economic Service)कडून असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इंजीनिअर्स उमेदवारांनी मिळवा सरकारी नोकरी!
'राइट्स'च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अर्ज...
Govt Job: राइट्स लिमिटेड म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्विस (Rail India Technical and Economic Service)कडून असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, इंजीनिअरिंग आणि टेक्निकल क्षेत्रात असिस्टंट मॅनेजरच्या एकूण 400 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 नोव्हेंबर 2025 सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवार राइट्सच्या अधिकृत करिअर पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
'या' पदांसाठी भरती
या भरतीच्या माध्यमातून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेटलर्जी, केमिकल्स, आयटी, फूड टेक्नॉलॉजी आणि फार्मास्युटिकल्स अशा विविध विभागांचा समावेश असून प्रादेशिकदृष्ट्या, उत्तर क्षेत्रात 149, पूर्व क्षेत्रात 97, पश्चिम क्षेत्रात 92 आणि दक्षिण क्षेत्रात 62 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. राइट्सच्या या भरतीअंतर्गत, सिव्हिलमध्ये 120, इलेक्ट्रिकलमध्ये 55, मेकॅनिकलमध्ये 150, एस अँड टीमध्ये 10, मेटलर्जीमध्ये 26, केमिकलमध्ये 11, आयटीमध्ये 14, फूड टेक्नॉलॉजीमध्ये 12 आणि फार्मामध्ये 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या पदांवर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांकडे पदवी (ग्रॅज्युएशन) डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, सर्व अभियांत्रिकी म्हणजेच इंजीनिअरिंग शाखांसाठी संबंधित विषयात पदवी आणि फार्मा साठी, फार्मसीमध्ये बॅचलर्स पदवी असणं अनिवार्य आहे. याशिवाय, उमेदवारांकडे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच पद्व्युत्तर शिक्षणानंतर, किमान 2 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.तसेच ट्रेनिंग, इंटर्नशिप किंवा पीएचडी रिसर्च कार्याच्या अनुभवामध्ये गणले जाणार नाहीत.
हे ही वाचा: मामा-मामीने केवळ 90 हजार रुपयांसाठी पाच वर्षांच्या भाचीला विकलं अन्... मुंबईतील धक्कादायक घटना
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 25 डिसेंबर 2025 तारीख लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाणार आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे, एससी/ एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि अपंग उमेदवारांना किमान 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.










