Palghar: चितेवर मृतदेह अर्धवट जळाला अन् पुरात गेला वाहून…,आता तरी सरकारला जाग येणार?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

no crematorium in village half-burnt body was washed away in river palghar story
no crematorium in village half-burnt body was washed away in river palghar story
social share
google news

पालघर (Palghar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुसळधार पावसामुळे नदीला पुर आल्याने अर्धवट अवस्थेत जळालेलं प्रेत पाण्यात वाहून गेल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त, शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही मरणयातना सोसाव्या लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.तसेच या घटनेनंतरही प्रशासनाला जाग येणार येणार आहे का? असा संतप्त सवाल केला जात आहे. (no crematorium in village half-burnt body was washed away in river palghar story)

पालघरच्या मनोर जवळील आवढाणीतील डुकले पाड्यात अद्याप स्मशानभूमी बांधण्यात आली नाही आहे. यामुळे गावातील ग्रामस्थ नदी किनारी उघड्यावर प्रेतावर अंत्यसंस्कार करतात. शुक्रवारी अशाचप्रकारे विष्णू शेलार या ज्येष्ठ ग्रामस्थांवर हात नदी जवळ अंत्यसंस्कार केले जात होते. या दरम्यान गावात मुसळधार पाऊस सुरू होता. या मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत नदीत वाहून गेल्याची घटना घडली. त्यामुळे या घटनेवर आता नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : Pune Acp गायकवाडांचं रक्त का खवळलं, पत्नीसोबत पुतण्याच्या हत्येची Inside Story

पालघर जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांवर आजही स्मशानभूमी नाही, तसेच ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना मरणानंतर ही मरणयातना सोसाव्या लागत असल्याचा धक्कादायक चित्र वारंवार समोर येत आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता स्थानिकांकडून केला जातो आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान याआधी देखील वर्षभरापुर्वी पालघऱ जिल्ह्यातला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत नदीतील पाण्यातून धोकादायक प्रवास करून अंत्ययात्रा नेण्यात आली होती. तसेच नंतर या प्रेतावर उघड्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले होते. त्यामुळे गावात रस्ता आणि स्मशानभूमी नसल्याने तलासरी बोरमाळ भेंडीपाडा येथील धक्कादायक वास्तव समोर आले होते.

पालघर जिल्हा हा आदिवासी बहूल परीसर आहे. या परीसरातील नागरीक स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. कधी गर्भवती महिलांना अॅम्ब्युलन्स मिळत नाही, त्यामुळे महिलांना डोलीत टाकून रूग्णालयात न्यावे लागते, तर कधी स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागते, असे सर्व प्रकार नेहमी समोर येत असतात.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nargis Delhi : भयंकर! मावशीच्या मुलीचा रॉडने गार्डनमध्येच पाडला मुडदा; कारण…

डुकले पाड्यातील ग्रामस्थांनी स्मशानभूमीची मागणी केली आहे. मात्र अदयापपर्यंत प्रशासन या मागणीकडे कानाडोळाच करत होती. आता घडलेल्या या घटनेने प्रशासन जागे होईल आणि स्मशानभूमी बांधून देईल अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT