कांदा महागणार ! व्यापाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप, नेमक्या मागण्या काय?
नाशिकमधील पाचशेपेक्षा जास्त कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने निर्यात शुल्क दरात 40 टक्क्यांनी वाढ केली आहे. ती निर्यात शुल्क कमी करण्यात यावी या मागणीसाठी नाशिकसह महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे.
ADVERTISEMENT
Onion traders strike: सरकारने निर्यात शुल्क वाढवल्याने नाशिकच्या (Nashik) कांदा व्यापाऱ्यांकडून बेमुदत संप (Indefinite strike) पुकारण्यात आला आहे. नाशिकमधील 500 व्यापाऱ्यांनी या संपात सहभाग दर्शवल्याने कांदा पुरवठा आता विस्कळीत झाला आहे. यामुळे कांद्याच्या दरात प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरी कांदा व्यापाऱ्यांनी आता निर्यात शुल्क (Export charges) कमी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार आणि व्यापारी संपाबाबत आपली भूमिका काय ठेवणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.(onion traders strike Indefinite Nashik district and Maharashtra, onion price will increase)
ADVERTISEMENT
कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप
नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. व्यापाऱ्यांच्या या संपामध्ये नाशिक जिल्ह्यातील 500 हून अधिक कांदा व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. व्यापाऱ्यांनी हा संप पुकारल्यामुळे तेथील कोणताही व्यापारी आता कांदा लिलावामध्ये सहभागी होत नाही. या संपामुळे कांद्याचा भाव वाढणार असून निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> Womens Reservation Bill: ऐतिहासिक… महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत एकमताने मंजूर!
निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू
शेती आणि व्यापाऱ्यांसाठी सरकारने वेगवेगळे नियम आणि कायदे केले आहेत. निर्यात शुल्काबाबतही सरकारने निर्णय घेऊन निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू केला आहे. त्यामुळेच कांदा व्यापाऱ्यांनी तो निर्यात शुल्क कमी करावा या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे नाशिकमधील कांदा बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे आता निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के शुल्क कमी करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हे वाचलं का?
भाववाढीमुळे शेतकऱ्यांना फायदा
व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका शेतकऱ्यांसह नागरिकांना बसणार आहे. मात्र या बेमुदत संपामुळे जर भाववाढ झाली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र संप लांबला तर मात्र जनसामन्यांना कांद्याचे दर परवडणारे नसतील असं मतही व्यक्त केले जात आहे. नाशिकमधील पाचशेहून अधिक व्यापाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याने कांद्याचे भाव वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कांदा लिलावात सहभाग नाही
नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. सरकारने लावलेले निर्यात शुल्क कमी करावे अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे. कांदा लिलावामध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग न घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या संपाचा फायदा शेतकऱ्यांना होणार की सरकार यावर काय निर्णय घेणार हे आता काहीच दिवसात स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
कांद्याचा पुरवठा विस्कळीत
सरकारने लावलेला 40 टक्के निर्यात शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठीच व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात अनेक व्यापारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि बाजारावर त्याचा परिणाम झाला आहे. मंडईतील अनेक व्यापारी लिलावामध्ये सहभाग घेत नसल्यामुळे आता कांदा पुरवठा विस्कळीत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Rape Case: Dombivli हादरली… लिव्ह-इन पार्टनर, दारू अन् 19 वर्षीय तरुणीवर मित्रांकडूनच बलात्कार
व्यापाऱ्यांचा आरोप
टोमॅटोनंतर आता कांद्याचे भाव वाढण्याचे शक्यता या संपामुळे झाली आहे. कारण नाशिक बाजारामध्ये काद्यांची खरेदी 2 हजार रुपये आहे. मात्र सरकारकडून दीड हजार प्रतिक्विंट दराने कांदा विकला जात आहे असा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT