Pradeep kurulkar : ‘झारा’ला सांगितलं ब्रह्मोसचं ‘सीक्रेट’, बाईच्या नादात…

मुंबई तक

महाराष्ट्र एटीएसने डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर यांना पुण्यातून अटक केली. कुरुळकर डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. त्याने हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

The Pakistani agent Zara and Pradeep Kurulkar were in contact with each other from June 2022 to December 2022.
The Pakistani agent Zara and Pradeep Kurulkar were in contact with each other from June 2022 to December 2022.
social share
google news

Pradeep Kurulkar Whatsapp Chats : डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरूळकरने केलेल्या प्रतापाने देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर झाला. ललनेच्या नादात प्रदिप कुरूळकरने भारताच्या संरक्षण खात्याशी संबंधित महत्त्वाच माहिती दिली. याप्रकरणात आता कुरूळकरचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहेत. यात कुरुळकरने झारा, आदितीला ब्रह्मोसबद्दलची गुपित सांगितली.

महाराष्ट्र एटीएसने डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर यांना पुण्यातून अटक केली. कुरुळकर डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. त्याने हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील एटीएसच्या आरोपपत्रानुसार प्रदीप पाकिस्तानी महिला एजंटकडे आकर्षित झाला होता. महिला एजंटने तिचे नाव ‘झारा दासगुप्ता’ असे सांगितले होते. पाकिस्तानच्या एजंटने प्रदीपशी संरक्षण प्रकल्पाव्यतिरिक्त भारतीय क्षेपणास्त्र प्रणालीबाबत चर्चा केली.

डीआरडीओचा शास्त्रज्ञ कसा पकडला गेला?

झारा दासगुप्ता नावाच्या पाकिस्तानी एजंटने स्वत:ला ब्रिटनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याचे सांगितले. अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून त्याने शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर याच्याशी मैत्री केली. या गोष्टी समजल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने तपास केला असता ‘झारा जसगुप्ता’चा आयपी अॅड्रेस पाकिस्तानचा असल्याचे निष्पन्न झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp