Pune Porsche Accident : 90 मिनिटांत दारूवर उडवले 48 हजार, पबमध्ये आरोपीने काय केलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अल्पवयीने आरोपीने भरले होते ४८ हजार बिल
अल्पवयीन आरोपीचे पबमधील फोटो आणि अपघातग्रस्त पोर्शे कार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे पोर्शे कार अपघातात नवी माहिती समोर

point

अल्पवयीन आरोपीने ९० मिनिटात दारूवर उडवले ४८ हजार

point

कोणत्या पबमध्ये गेला होता आरोपी?

Pune Accident Latest News : (ओमकार वाबळे, पुणे) पुण्यापासून दिल्लीपर्यंत पुण्यातील पोर्शे कार अपघाताची चर्चा सुरूये. मद्यधुंद अवस्थेत पबमधून बाहेर पडलेल्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दुचाकी उडवली. ज्यात तरुणीचा जागीच, तर तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या या घटनेबद्दल दररोज नवनवी माहिती समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपींने तब्बल ९० मिनिटात ४८ हजार रुपये दारूवर उडवले, अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे. (the accused had gone to two famous pubs of the city with his friends. He had spent 48 thousand rupees in just 90 minutes in the first pub)

ADVERTISEMENT

पोर्श कारने दोन आयटी अभियंत्यांना उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला कोर्टातून जामीन मिळाला असला, तरी या प्रकरणी त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. आता असे समोर आले आहे की, या अपघातापू्र्वी आरोपी मित्रांसह शहरातील दोन प्रसिद्ध पबमध्ये गेला होता. त्याने पहिल्या पबमध्ये अवघ्या 90 मिनिटांत 48 हजार रुपये खर्च केले होते.

अपघातापूर्वी आरोपी कोणत्या पबमध्ये गेला होता?

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, आरोपी शनिवारी (१८ मे) रात्री 10.40 वाजता कोझी पबमध्ये गेला होता. कोझी पब बंद झाल्यानंतर आरोपी 12.10 वाजता त्याच्या मित्रांसह बाहेर आला. या कालावधीत म्हणजे अवघ्या 90 मिनिटांत त्यांचं 48 हजार रुपये बिल झालं होतं."

हे वाचलं का?

हेही वाचा >> 'शिंदे साहेब, गजानन कीर्तिकरांची त्वरित हकालपट्टी करा', शिवसेना नेता संतापला

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कोझी पबनंतर तो ब्लॅक मॅरियट या दुसऱ्या पबमध्ये गेला होता. 

ते म्हणाले, "आम्हाला 48,000 रुपयांचे पबचे बिल मिळाले आहे, जे अल्पवयीन मुलाच्या चालकाने भरले होते. या बिलात आरोपी आणि त्याच्या मित्रांना दिल्या जाणाऱ्या दारूच्या किमतींचा समावेश आहे."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ईव्हीएम स्ट्राँगरुमपर्यंत गेला अन्...; लंकेनी व्हिडीओच दाखवला 

पुण्यातील हे दोन्ही पब पोलिसांनी सील केले आहेत.

ADVERTISEMENT

एसीपी मनोज पाटील म्हणाले, "अल्पवयीन आरोपी मित्रांसोबत एका पबमध्ये गेला होता आणि कार चालवण्यापूर्वी त्याने दारू प्यायली होती. आरोपीने त्याच्या मित्रांसोबत दारू पिल्याचे भरपूर सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत. रक्ताच्या नमुन्याचा अहवाल आलेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून, 17 वर्षीय आरोपीविरुद्ध मोटार वाहन कायद्याचे कलम 185 (मद्यपान करून वाहन चालवणे) जोडण्यात आले आहे."

पोर्श कारची नोंदणीच नाही

ज्या पोर्शे कारने धडक दिली, त्या कारची नोंदणीही झाली नसल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र परिवहन विभागाने सांगितले की, 1,758 रुपये शुल्क न भरल्याने कारची नोंदणी मार्चपासून प्रलंबित आहे. 

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या नोंदीनुसार, कार मालकाकडे कर्नाटकने जारी केलेले वैध पण, तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आहे, ज्याची वैधता मार्च ते सप्टेंबर 2024 पर्यंत अशी सहा महिन्यांची आहे.

हेही वाचा >> "उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी मी युर्टन घेतोय, माझ्या... ", फडणवीसांनी टाकला राजकीय बॉम्ब 

अधिकाऱ्याने सांगितले की, बंगळुरूमधील पोर्श डीलरची चूक नव्हती, कारण त्यांनी तात्पुरती नोंदणी करून कार सुपूर्द केली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहने चालवण्यापूर्वी त्याची आरटीओकडे नोंदणी करण्याची जबाबदारी मालकाची होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT