Pune Accident : आरोपी की, ड्रायव्हर... कोण चालवत होतं पोर्श कार? अखेर सत्य आलं समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवीन माहिती या प्रकरणात दिली आहे.
पुण्यातील पोर्श कार अपघातात नवीन माहिती समोर.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण

point

"अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न झाला"

point

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?

Pune Accident Accused : (ओमकार वाबळे, पुणे) पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पुण्यापासून दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या या प्रकरणात आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवी माहिती दिली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी केलेल्या दावा खोटा ठरला आहे. (The accused tried to change driver after porsche car accident)

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासात समोर आलेल्या गोष्टींबद्दल माहिती दिली. 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "आम्ही घरातून बाहेर पडल्यापासून ते अपघात झाला तोपर्यंत आणि आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जाईपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा तपास केला आहे. प्रत्येक सीसीटीव्ही, प्रत्येक ठिकाणची कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत."

सुरक्षा रक्षकांच्या रजिस्टरमध्ये नोंद 

अमितेश कुमार म्हणाले की, "तो ज्यावेळी घरातून बाहेर पडला, त्यावेळी त्याच्या घराच्या सुरक्षा रक्षकाच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे की, ही गाडी ते मुले घेऊन बाहेर पडले आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा तपास पोलीस करत आहेत. पुरावे गोळा करत आहेत. ही गाडी हाच मुलगा चालवत होता."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "भाजप 370 जागा जिंकणं अवघड, 4 राज्यात बसू शकतो झटका"

"ही गोष्ट खरी आहे की, अपघात झाला त्यानंतर ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला होता. ही बाब आमच्या चौकशीमध्ये समोर आली आहे. म्हणून ज्याने अशा प्रकारे पुराव्यांमध्ये छेडछाड केली. त्याच्यावर आयपीसी २०१ कलमान्वये पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात येईल", अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

हेही वाचा >> "फडणवीसांनी फोन केला अन्...', देशमुखांनी सांगितला ठाकरेंचं सरकार पडण्यापूर्वीचा किस्सा 

"ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी काही घटना दिसून येत आहे की, ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे अल्पवयीन आरोपी गाडी चालवत नव्हता, तर दुसरा कुणीतरी गाडी चालवत होता, असे करण्याचे प्रयत्न झाला", असे ते म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे 

- आधी ३०४ अ कलम लावलं होतं. त्यानंतर गुन्ह्याची गंभीरता पाहता ३०४ लावलं. 

ADVERTISEMENT

- आरोपीविरोधात आम्ही भक्कम केस तयार करत आहोत. त्याविरोधात पुरावे जमा करत आहोत. कोणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला का याचा देखील तपास करत आहोत. 

- विशेष वकील नेमण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दबाव आला, दिरंगाई झाली, असं म्हणणं योग्य नाही.
 
- सुरुवातीला ३०४ का लावलं नाही किंवा आरोपीला काही सुविधा पुरवण्यात आली यााबबत चौकशी सुरु आहे. सुविधा पुरवण्यात आली याबाबत काही तथ्य समोर आलं नाही.

- प्रत्यक्षदर्शीला कोणी धमकावलं असेल, तर त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल. 

- ब्लड रिपोर्ट मिळाला नाही. सुरुवातीला ब्लड सॅपल घेण्यात आलं आणि फॉरेन्सिकला पाठवलं होतं. त्यानंतर आणखी एक सॅपल घेतलं होतं. त्यानंतर फॉरेन्सिक सांगितलं की दोन्ही सँपलचा डीएनए एकच आहे का हे तपासण्यासाठी सांगितलं आहे. 

 
 

- पबमध्ये पार्टी करत असल्याचे संपूर्ण सीसीटिव्ही फुटेज आमच्याकडे आहे. ही केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही. या केसची दिशा वेगळी आहे. 

- त्यांच्या कृत्यामुळे ३०४ चा गुन्हा होऊ शकतो हे त्याला माहीत होतं, ही आमची केस आहे. 

पहिल्या सँपलमध्ये दारु प्यायली होती का हे तपासण्यात आलं. दुसरं सँपल घेणं सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलं. पहिलं सँपल ११ च्या सुमारास घेण्यात आलं. दुसरं सँपल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी घेण्यात आलं. 

- यात दोन एफआयर दाखल करण्यात आल्या आहेत. पहिली एफआयर सकाळी ८ वाजता दाखल करण्यात आली. तीन तासानंतर ३०४ लावण्यात आलं. त्याची स्टेशन डायरी एन्ट्री देखील आहे. 

- दुसरी एफआयर ज्युविनाईल जस्टिस अॅक्टनुसार त्याच्या वडिलांवर एफआर दाखल करण्यात आली आहे.

- व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कोणी हा व्हिडीओ तयार केला इथपर्यंत आम्ही पोहचत आहोत. तो व्हिडीओ त्या मुलाने तयार केलेला नाही. 

- गाडीत चार लोक होते. एक गाडी चालवत होता आणखी दोन आणि एक ड्रायव्हर होता.
येरवड्याच्या अधिकाऱ्यांमध्ये काही दोष दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत आहे. 

 

follow whatsapp

ADVERTISEMENT