MNS : ‘राज ठाकरे दलाल, अमित खंडणीखोर’, मनसे नेत्याच्या आरोपानंतर तुफान राडा
मराठी मराठी करायचं आणि मराठ्यांच्या नावावर अन्याय करायचा, मराठ्यांच्या नावावर हे थोतांड ठाकरे आहेत. मराठी माणसांचे कैवारी नाहीत. हे व्यापाऱ्यांचे कैवारी आहेत. राज ठाकरे आणि त्याचा पक्ष दलाल आहे, फक्त वसूली बहाद्दर करणारा पक्ष आहे,अशी टीका महेश जाधव यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
Mns News : निलेश पाटील, नवी मुंबई : नवी मुंबईत मनसे पदाधिकारी महेश जाधवला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही मारहाण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी केल्याचा आरोप जाधवांनी केला आहेत. फेसबूक या सोशल मीडियावर त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.मात्र मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी जाधवांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान जाधव यांना झालेल्या या मारहाणीनंतर आता नवी मुंबईत जाधव समर्थक माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत तणावाचे वातावरण आहे.
महेश जाधवांच्या व्हिडिओत काय?
मनसेच्या मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबूक लाईव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. मला मारायचंच आहे तर जीवे मारून टाका, पण मी हे सोडणार नाही. मराठी मराठी करायचं आणि मराठ्यांच्या नावावर अन्याय करायचा, मराठ्यांच्या नावावर हे थोतांड ठाकरे आहेत. मराठी माणसांचे कैवारी नाहीत. हे व्यापाऱ्यांचे कैवारी आहेत. राज ठाकरे आणि त्याचा पक्ष दलाल आहे, फक्त वसूली बहाद्दर करणारा पक्ष आहे,अशी टीका महेश जाधव यांनी केला आहे. 20 वर्ष घालवली राज ठाकरेसोबत त्यांचा पक्ष हा खंडणीखोर आहेत. अमित ठाकरेंना पक्षात खंडणी गोळा करण्यासाठी ठेवल्याचाही आरोप जाधव यांनी केला आहे.
हे ही वाचा : Mla Disqualification : शिंदे-ठाकरेंची धडधड वाढली, व्हीपच करणार करेक्ट कार्यक्रम!
कामगारांची बाजू घेणे सोडत नाही म्हणून अमित ठाकरे य़ांनी राजगढ येथे बोलावून बेदम मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. राजगढावर मी कामगारांची बाजू घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. हे ठाकरे आहेत की गुंड आहेत,अशी टीकाही जाधव यांनी अमित ठाकरेंवर केली. यासोबत अमित ठाकरे सारख्या माणसाला हे शोभत नाही, त्यांना 800 हजार गरिब कामगारांचा तळतळाट लागेल, असे जाधव म्हणाले आहेत. दरम्यान या फेसबूक लाईव्ह नंतर माझा जीवही घेतला जाईल. मला मारून टाकतील, माझा मर्डर होईल, परंतू हा विषय मी सोडणार नाही, असे देखील लाईव्हमध्ये जाधव म्हणाला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मारहाणीच्या या घटनेनंतर महेश जाधव यांना मेरी कव्हरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मारहाणीची माहिती जाधव समर्थकांना मिळताच त्यांनी रूग्णालयाबाहेर गर्दी केली होती. या घटनेनंतर काही मनसे कार्यकर्ते जाधव यांची भेट घेण्यासाठी रूग्णालयात आले होते. मात्र संतापलेल्या जाधव समर्थकांनी त्यांना पळवून पळवून मारलं. मनसे कार्यकर्ते एका सोसायटीत लपायला गेले् असता त्या सोसायटीच्या रूमच्या काचा माथाडी कामगारांनी फोडल्या होत्या. यानंतर नवी मुंबईत मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगारांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 4 वर्षाच्या मुलाचा आईनेच चिरला गळा, CEO सूचना सेठने केलेल्या हत्येची Inside Story
जाधवांचे आरोप मनसेने फेटाळले
हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आता महेश जाधव यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. इतकंच नाही मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जाधव यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर खोटे आरोप केल्याचे चिले यांनी म्हटले आहे. महेश जाधव अनेक बिल्डरांकडून खंडणी मागायचे. या सगळ्या तक्रारी राजगढावर येत होत्या. अनेक मालकांच्या कामगार सेनेविरूद्धही तक्रारी येत होत्या. याबाबत पक्षाकडून त्यांना सुचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील जाधवांचे हे प्रकार थांबले नव्हते.
ADVERTISEMENT
आज पक्ष कार्यालयात अनेक कामगार आले होते, यावेळी महेश जाधवांना बोलावले होते. कामगारांनी महेश जाधवांना प्रश्न विचारताच त्यांनी उद्धटपणे उत्तर दिली. त्यामुळे कामगारांनी त्यांच्यावर हात टाकला होता. अमित ठाकरे यांनी त्यांना कामगारांपासून वाचवले होते. असे असून सुद्धा जाधव जर अमित ठाकरेंवर आरोप करत असतील तर हे दुदैव आहे, असे योगेश चिले यांनी म्हटले आहे. दरम्यान आता मनसे प्रवक्त्याच्या आरोपावर आता महेश जाधव काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT