सांगलीत दारू बनवत असताना अचानकपणे स्फोट होऊन आगीचा भडका, आठ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Sangli news : सांगलीतील तासगांव तालुक्यातील कवठेएकंद येथील सुतार समाज हॉल येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी दारूचा स्फोट होऊन आठ जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

sangli news
sangli news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सांगलीतील कवठेएकंद येथे दारूचा स्फोट

point

स्फोटात आठ जण गंभीर जखमी

point

नेमकं काय घडलं?

Sangli news : सांगलीतील तासगांव तालुक्यातील कवठेएकंद येथील सुतार समाज हॉल येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी दारूचा स्फोट होऊन आठ जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. मंडळाचे कार्यकर्ते नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शोभेची दारू तयार करत होते. तेव्हा अचानकपणे दारूने पेट घेतल्यानं स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि त्यातूनच ही दुर्देवी घटना उघडकीस आली. यामध्ये सहा जखमी असून इतर दोघेजण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.

हे ही वाचा : chaitanyananda swamy arrest : मुलींचं लैंगिक शोषण आणि अश्लील मेसेज केल्याच्या आरोपावरून चैतानंद सरस्वतीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

गंभीर जखमींची नावे 

मंडळाचे कार्यकर्ते दारू तयार करत होते तेव्हा दारूने अचानकपणे पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटा दोघेजण 60 टक्के म्हणजे गंभीर जखमी असल्याचं वृत्त आहे. जखमींची नावे आता समोर आली आहे. आशुतोष बाळासाहेब पाटील (वय 16), आनंद नारायण यादव (वय 55), विवेक आनंदराव पाटील (वय 38), सौरभ सुहास कुलकर्णी (वय 27), ओमकार रवींद्र सुतार (वय 21), अंकुश शामराव घोडके (वय 21), प्रणव रवींद्र आराधे (वय 21), गजानन शिवाजी यादव (वय 28) हे एकूण आठ जण या दारूच्या स्फोटात गंभीर भाजले गेलेत. यापैकी दोघांना किरकोळ जखम झाली आहे. तर रुग्णालयात दाखल केलेल्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. जखमींवर सांगलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं बोललं जातंय.

गावीतल ब्राह्मण गल्लीतील असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर दारू बनवण्याचे काम सुरु होते. तेव्हा हे आठ तरुण दारूची चाचणी करत असताना दारुचा मोठा स्फोट झाला आणि पेट घेतला असता, ही दुर्घटना घडलीय संबंधित प्रकरणात वरील आठ जण जखमी झाले आहेत. ही घटना पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीत होरपळलेल्यांना रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा : लेकीनं पाकिटातून 500 रुपये घेतले, वडिलांना कळताच शेतात नेलं अन् भयानक कट रचत नको तेच...

पोलिसांनी दारू तयाक करण्याबाबत केलं प्रतिबंध 

आठ वर्षांपूर्वी देखील अशीच घटना घडली होती, तेव्हा या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता त्याच घटनेची पुनरावृत्ती दिसून आली आहे. दरम्यान, पोलिसांनी दारू तयार करण्याबाबत प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ही परंपरा असल्याचं सांगत ग्रामस्थांनी पोलिसांनी प्रतिबंध केलेल्या नियमांचं पालन केलं नाही आणि ही घटना घडली.

हे वाचलं का?

    follow whatsapp