Sankashti Chaturthi: 2023 वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त-पूजा विधी

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Sankashti Chaturthi: 2023 वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त-पूजा विधी
Sankashti Chaturthi: 2023 वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आज, जाणून घ्या शुभ मुहूर्त-पूजा विधी
social share
google news

Akhuratha Sankashti Chaturthi 2023: वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणरायाची पूजा केली जाते. भगवान गणेश हे सर्वात पूज्य देवतांपैकी एक मानले जातात. श्री गणेश (Shree Ganesh) हे शक्ती आणि बुद्धीचे दैवता मानले जातात. असे म्हटले जाते की भगवान गणेश आपल्या भक्तांच्या सर्व अडचणी आणि अडथळे दूर करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता असेही म्हणतात. (Sankashti Chaturthi December 2023 know About Shubh Muhurata Puja Vidhi)

ADVERTISEMENT

हिंदू धर्मात, देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपवास पाळले जातात, परंतु भगवान गणेशासाठी पाळला जाणारा संकष्ट चतुर्थी उपवास सर्वात खास आणि विशेष मानला जातो.

वाचा : Ayodhya Visit: एअरपोर्ट, नवीन रेल्वे स्टेशन… PM मोदी अयोध्येत आणखी कोणते बदल करणार?

अखुरथ संकष्ट चतुर्थी म्हणजे काय?

हिंदू पंचांगानुसार, वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आज 30 डिसेंबर रोजी साजरी केली जात आहे. याला अखुरथ संकष्ट चतुर्थी असंही म्हणतात. चतुर्थी तिथी 30 डिसेंबर रोजी म्हणजेच आज सकाळी 9.43 वाजता सुरू झाली असून 31 डिसेंबर रोजी सकाळी 11.55 वाजता समाप्त होईल. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री 8.36 वाजता चंद्राला अर्घ्य (हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन चंद्राला जल समर्पित करणे) दिले जाईल.

हे वाचलं का?

अखुरथ संकष्ट चतुर्थी पूजन विधी

या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. मग स्वच्छ कपडे घाला. पूजा करताना घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक पाट ठेवा. त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र घेऊन श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करा. सर्वप्रथम गणेशाचे ध्यान करताना व्रत करण्याचा संकल्प घ्या. पूजा विधी सुरू करताना गणेशाला पाणी, दुर्वा, अक्षता आणि सुपारी अर्पण करा.

वाचा : Rashmi Shukla : मोठी बातमी! रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, कारण…

चांगल्या आयुष्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना करा आणि या दरम्यान “गं गणपतये नमः” मंत्राचा जप करा. गणपतीला मोतीचूर लाडू, बुंदी किंवा पिवळे मोदक प्रसाद म्हणून अर्पण करा. पूजा संपल्यानंतर चंद्रदेवाला दूध, चंदन आणि मधाने अर्घ्य अर्पण करावे. त्यानंतर प्रसाद स्वीकारावा.

ADVERTISEMENT

अखुरथ संकष्ट चतुर्थीला कोणत्या मंत्रांचा जप करावा?

  • गजाननम् भूत गणादी सेवितं, कपित्थ जंबू फल चारु भक्षणम्।
  • उमासुतं शोका विनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम्।

वाचा : ‘5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य वास्तववादी’, PM मोदींनी उदाहरणं देऊन स्पष्टच सांगितलं

संकष्ट चतुर्थीच्या गणेश पूजेचे महत्व

श्रीगणेशाला शास्त्रात विघ्नहर्ता म्हटलं आहे. त्यांची पूजा केल्याने मानवी जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होतात. जो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र श्री गणेशाचे खऱ्या मनाने ध्यान करतो, त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात आणि त्याच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी येते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT