Election Commission: अजित पवारांचं मोठं पाऊल, सुरू केली तयारी
अजित पवारांनी बंड करत ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे समोर आले.
ADVERTISEMENT

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंनी शिवसेना मिळवल्यानंतर अजित पवारांनीही त्याच मार्गावरून वाटचाल सुरू केली आहे. आम्हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असा दावा करणाऱ्या अजित पवारांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तयारीत जाण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईतील बैठकीवेळीच अजित पवारांनी जिल्हाध्यक्षांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र घेतली जात आहे.
अजित पवारांनी बंड करत ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे समोर आले. आता दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात असून, मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर येथे शरद पवारांच्या गटाने बैठक आयोजित केली आहे, तर दुसरीकडे वांद्रे येथील एमईटी सभागृहात अजित पवारांच्या गटाने बैठकीचे आयोजन केले आहे.
रस्त्यावरची लढाई आता निवडणूक आयोगात
या दोन्ही बैठकांमध्ये शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहे. एकीकडे दोन्ही गटाकडून रस्त्यावरची लढाई लढली जात असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादीच्या फुटीचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. बैठकीनंतर अजित पवारांचा गट निवडणूक आयोगामध्ये धाव घेणार आहे.