‘एकमेकांच्या पायात पाय घालून…’, सर्व जागा लढवण्याबद्दल शरद पवार काय बोलले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्ष सोडून जात आहेत, त्याचा फटका बसेल का?’, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला.
ADVERTISEMENT
Sharad Pawar News : राज्यात जागावाटपाबद्दलची चर्चा जोरात सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने भूमिका मांडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना पूर्ण जागा लढता येत नाही, हे अपयश वाटतं का?’, या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्ष सोडून जात आहेत, त्याचा फटका बसेल का?’, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “साधारणतः कोण जातंय, याचा आढावा घेतल्यानंतर फारशी चिंताजनक स्थिती आहे, असं वाटत नाही. मी जी माहिती घेतली, तर त्यात जे जात आहेत, त्यांच्याबद्दल चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही.”
राज्यातील हिंसक घटनावरून पवारांचे राज्य सरकारकडे बोट
राज्यात झालेल्या हिंसक घटनांवर बोलताना शरद पवार म्हणाले, “नगरला काहीतरी झालं. कोल्हापूरला कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. चुकीचा असेल, पण लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरूप देणं, हे काही योग्य नाही.”
हे वाचलं का?
“आज सत्ताधारी पक्ष आहे, तो अशा सगळ्या गोष्टींना प्रोत्साहित करतोय. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची आहे. पण, राज्यकर्तेच जर उतरायला लागले, त्यांचे सहकारीच उतरायला लागले. त्यातून दोन समाजांमध्ये, जातींमध्ये कटुता निर्माण व्हायला लागली, तर हे काही चांगलं लक्षण नाहीये”, अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली.
हेही वाचा >> शरद पवार संतापले, PM मोदींवर बरसले; महाविकास आघाडीलाही सुनावलं
“मर्यादित भागात झालं असेल, तर चांगली गोष्ट आहे. मी ते म्हणत नाहीये. मी हे म्हणतोय की, हे घडवलं जातंय. आज मी सकाळी टिव्हीवर बघितलं की, औरंगाबादमध्ये कुणीतरी औरंगजेबचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करायचं काय कारण? त्यासाठी पुण्यात आंदोलन करण्याचं काय कारण? फोटो दाखवला, त्यातून लगेच काय परिणाम होतो, हे मला काही समजत नाही. कुणाला पडलंय?”, असा सवाल करत पवारांनी राज्यात घडलेल्या हिंसाचारावर भाष्य केलं.
ADVERTISEMENT
यामागे समाजाच्या हिताची नसलेली विचारधारा -शरद पवार
“ओडिशा आणि काही राज्यात चर्चवरती हल्ले झाले. खरंतर ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय असतो. एखाद्याची काही चुक असेल, तर पोलीस कारवाई करावी. त्यासाठी धार्मिक स्थळावर हल्ला कशासाठी करायचा? हे जे घडतंय, ते सहजासहजी किंवा एकट्या दुकट्याचं काम नाही. त्याच्यामध्ये काही विचारधारा आहे. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाहीये”, असं शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह, काय घडलं?
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना पूर्ण ताकदीने पूर्ण जागा लढता येत नाही, हे मागच्या काही निवडणुकात दिसलं. सगळ्या पक्षाचं हे अपयश वाटतं का? त्यावर पवार म्हणाले, “असं काही नसतं. जागा लढवू शकतात, पण जागा लढवणं कशासाठी, याचा विचार करावा लागतो. एकमेकांच्या पायात पाय घालून आपण विरोधकांची शक्ती विभाजित करून सत्ताधाऱ्यांना मदत करणे, हे शहाणपणाचं नाही. त्याच्यात मर्यादित जागा लढवता येतील का? आपली शक्तीस्थाने आहेत, तिथे लक्ष केंद्रीत करता येतील का? हे म्हणणं राजकीय व्यवहाराचं लक्षणं आहे”, अशी भूमिका पवारांनी यावेळी मांडली.
देशातील विरोधकांच्या बैठकीची तारीख ठरली
शरद पवार यांनी सांगितले की, “प्रत्येक पक्ष आपापलं काम करतो. राष्ट्रवादी आपल्या कामाला लागली. काँग्रेस आपल्या कामाला लागली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही कामाला लागली आहे. काल मला बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. एक दोन लोकांनी तारीख बदलता आली, तर बदला. त्यांनी मलाही विचारलं. मी त्यांना सांगितलं की, सगळ्यांना सोयीची असलेली ठरवा. 22-23 तारखेला पाटण्यात बैठक आहे, असं त्यांनी मला सांगितलं”, अशी माहिती पवारांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT