Datta Dalvi : मोठी बातमी! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड
दत्ता दळवी यांच्या निवासस्थानी दाखल होऊन तीन ते चार तरूणांनी त्यांची गाडीच्या काचा फोडल्या आहेत. दगडाने व लाकडाने गाडीवर हल्ला करून काचा फोडण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
ADVERTISEMENT
Datta Dalvi car vandalised : ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. या टीकेनंतर आज सकाळीच दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर वाद शमण्याची शक्यता होती. मात्र आता दत्ता दळवी यांच्या गाडीची (Datta Dalvi car vandalised) तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तीन ते चार तरूणांनी मिळून दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. (shiv sena ubt datta dalvi car vandalised three four youth shivsena shinde maharashtra politics)
दत्ता दळवी यांच्या निवासस्थानी दाखल होऊन तीन ते चार तरूणांनी त्यांची गाडीच्या काचा फोडल्या आहेत. दगडाने व लाकडाने गाडीवर हल्ला करून काचा फोडण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
हे ही वाचा : Dhule News : धुळ्यात रीलबहाद्दर तरूणाला पोलिसांनी घडवली अद्दल, नेमकी काय शिक्षा दिली?
दत्ता दळवींना अटक
माजी महापौर तथा उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधान केले होते. या प्रकरणी बुधवारी (29 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली होती.भूषण पलांडे या व्यक्तीने दत्ता दळवी यांच्या भाषेवर आक्षेप घेत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि 153(A),153 (B),153(A)(1)सी,294, 504,505(1)(C) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Tunnel Rescue : 41 मजुरांचे जीव वाचवणारा ‘रिअल हिरो’, कोण आहेत रॅट मायनर मुन्ना कुरेशी?
दत्ता दळवींचे विधान काय?
भांडुपमध्ये रविवारी (26 नोव्हेंबर) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना दत्ता दळवी म्हणाले होते की, “आज मिंधे गट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार या ठिकाणी आरूढ झालेले आहे. “मला वाटतं आज कदाचित दिघे साहेब असते ना, तर मी सांगतो या एकनाथ शिंदेला चाबकाने फोडुन काढलं असतं. आम्ही सगळं बघितलेले आहे.”
“एकनाथ शिंदे काय होता? एकनाथ बिंदे होता कुठे, काय करत होता; हे आम्ही स्वतः बघितलेले आहे. समजलं का मी स्वतः बघितलेले आहे. परतु बाळसाहेबांच्या जवळ आला. बाळासाहेबांनी आशिर्वाद दिले. उद्धवजींच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. पक्षाशी गद्दारी केली”, अशी टीका दत्ता दळवींनी केली होती.
ADVERTISEMENT
“नाव बाळासाहेबांचं वापरायचे. आता ते हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे #@डीच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का?”, अशी टीका दत्ता दळवींनी शिंदेंवर टीका केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT