Kalyan: ‘नात माझ्याकडून सटकली अन् नाल्यात…’, ‘तेव्हा’ काय घडलं आजोबांनी सांगितलं!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

On July 19, a shocking incident took place during the downpour in Mumbai. In which a six-month-old girl escaped from her grandfather's hands and fell directly into the drain. Now the girl's grandfather has given exact information about this incident
On July 19, a shocking incident took place during the downpour in Mumbai. In which a six-month-old girl escaped from her grandfather's hands and fell directly into the drain. Now the girl's grandfather has given exact information about this incident
social share
google news

भिवंडी: कल्याण-ठाकुर्ली (Kalyan-Thakurli)दरम्यान दोनच दिवसांपूर्वी एक सहा महिन्यांची चिमुकली ही तिच्या आजोबांच्या हातातून निसटून थेट वाहत्या पाण्यातील नाल्यात पडली होती. याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर काही वेळातच चिमुकलीला एनडीआरएफने (NDRF) वाचवलं अशीही माहिती अचानक व्हायरल होऊ लागली. पण आता तब्बल 48 तास उलटून गेलेले असतानाही तो निष्पाप जीव अद्यापही सापडलेला नाही. आता ही नेमकी घटना कशी घडली याबाबत चिमुकल्या मुलीच्या आजोबांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. (shocking incident kalyan thakurli a six month old girl escaped from her grandfather hands and fell in drain now grandfather given exact information about incident)

‘त्या’ चिमुकलीच्या आजोबांनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं:

मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर पोगुल हे आपल्या मुलीसोबत नातीला घेऊन वाडिया रुग्णालयात गेले होते. तिथून परतत असतानाच ही दुर्देवी घटना घडली. पाहा या घटनेबाबत ते नेमकं काय म्हणाले:

‘मी वाडिया रुग्णालयात गेलो होतो. मला कोपरला उतरायचं होतं. पण मी कोपरला उतरलो नाही.. कल्याण स्टेशन जवळ आहे म्हणून मी पुढे आलो. त्यानंतर मी डोंबिवलीच्या पुढे जी खाडी आहे तिकडे ट्रेन बराच वेळ थांबली म्हणून मध्येच उतरलो. इथेच आधी पाय घसरुन माझी मुलगी आधी पडली होती. त्यानंतर मी पण पडणार होतो. पण त्यावेळी माझ्या हातून माझी नात सटकली. गेल्या सहा महिन्यापासून माझ्या नातीवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’

‘गाड्या सगळ्या थांबल्या होत्या. तर आम्ही पण खाली उतरलो त्याच वेळी आमचा पाय घसरला.. पहिले माझ्या मुलीचा पाय घसरला म्हणून मी तिला उचलायला गेलो. तिला उचललं दोघा तिघांनी.. नंतर मी नातीला घेऊन चालायला लागलो.. तर माझा पाय घसरला.. त्याच वेळी माझी नात माझ्या हातातून सटकली..’

‘नेमकी परिस्थिती म्हणजे संपूर्ण लोकल खाली झाली होती. त्यामुळे आम्ही पण उतरलो होतो. तीन तास गाडी एकाच ठिकाणी थांबली होती. आम्ही बाराला निघालो होतो..’

‘प्रत्येक महिन्याला आम्ही जात होतो.. म्हणजे वाडिया रुग्णालयात दाखवायला.. वाडिया रुग्णालयातच उपचार सुरू होते. भिवंडीत उपचार झाले असते तर 100 टक्के ही घटना टळली असती.’

‘भिवंडीत ती सुविधा नाही. तिला ऑपरेशनसाठी चार-पाच लाख बोलले होते. तर आम्हाला डॉक्टरने सांगितलं की, वाडिया रुग्णालयात चांगले उपचार होतात. म्हणून सहा महिने तिकडे उपचार सुरू होते. बाळाचा शोध सुरू आहे. बाळ सापडलं तर आम्हाला कळवणार असल्याचं सांगितलं जाईल असं म्हणाले आहेत.’ असं म्हणत दुर्दैवी घटनेबाबत ज्ञानेश्वर पोगुल यांनी दु:ख व्यक्त केलं.

नेमकी घटना काय?

19 जुलै रोजी मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस बरसत असल्याने त्याचा परिणाम हा लोकल ट्रेनवर झाला होता. दरम्यान, कल्याणनजीक सिग्नल न मिळाल्याने थांबलेल्या लोकलमधून उतरून एक सहा महिन्याच्या बाळाला आई आणि आजोबा घेऊन पायी चालले असताना सहा महिन्याची चिमुकली ही नाल्यात पडली आणि थेट खाडीच्या प्रवाहातून वाहून गेली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

योगिता रुमाळे या मुंबईहून आपल्या वडिलांसह सहा महिन्याच्या ऋषिकाला घेऊन प्रवास करत होती. मात्र, मुसळधार पावसामुळे आधीच ठप्प असलेल्या लोकल सेवेला अनेक ठिकाणी ट्रॅकवरील पाणी आणि सिग्नल मिळत नसल्याने लोकल एकाच ठिकाणी बराच काळ उभ्या होत्या. त्यातच योगिता ज्या लोकलमधून प्रवास करत होती ती लोकल कल्याण-ठाकुर्ली दरम्यान आली असता सिग्नल न मिळाल्याने बराच वेळ थांबली होती. त्यामुळे योगिता आणि योगिताच्या वडिलांनी लोकलमधून उतरून पायी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

मात्र, ट्रेनच्या अगदी अरूंद बाजूने जात असताना योगिताचा तोल गेला.. त्यामुळे योगिताला तिच्या वडिलांनी उचलण्याचा प्रयत्ना केला. त्यानंतर पुढे चालत असताना त्यांचा तोल गेला हातात आणि त्याचवेळी त्यांच्या हातून देखील ऋषिका निसटली आणि थेट खाली नाल्यात पडली. यावेळी नाल्याच्या पाण्याला पावसामुळे मोठा प्रवाह असल्याने ऋषिका वाहत वाहत थेट खाडीमध्ये गेली.

ADVERTISEMENT

दरम्यान यानंतर तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी येत सहा ते सात तास शोध घेतला. पण ऋषिका काही त्यांना सापडली नाही. त्यानंतर एनडीआरएफला पाचरण करण्यात आलं. मात्र, अंधार झाल्याने एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने शोध कार्य थांबवलं होतं. आज (20 जुलै) पुन्हा एकदा सकाळपासून ऋषिकाचं शोधकार्य एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आलं होतं. मात्र आता ते देखील एनडीआरएफकडून थांबविण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

‘ते’ बाळ खरंच वाचलं?

दरम्यान, लोकलमधून उतरताना एका महिलेच्या हातून तिचं बाळ निसटून थेट नाल्यातून वाहून गेल्याचं वृत्त प्रचंड व्हायरल झालं. कारण प्रत्यक्षदर्शींपैकी काही जणांनी हा प्रकार ट्रेनमधून आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. ज्याचा व्हिडीओ हा अवघ्या काही मिनिटात प्रचंड व्हायरल झाला. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याने प्रत्येकाने याबाबत हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच अचानक सोशल मीडियावर पुन्हा एकदा अशी माहिती व्हायरल झाली की, कल्याणजवळ नाल्यात पडलेलं बाळ हे सापडलं आहे. त्याला एनडीआरएफने वाचवलं आहे. अशा मेसेजसह एक फोटो देखील व्हायरल झाला. ज्यामध्ये एनडीआरएफच्या टीमने एका बाळाला हातात घेतलं असल्याचं पाहायला मिळत होतं. या फोटोमुळे अनेकांचा असा समज झाला की, कल्याणमध्ये वाहून गेलेलं ते बाळ सुखरुपपणे वाचलं.

पण दुर्दैवाने असं घडलेलं नाही. कारण व्हायरल केला जाणारा फोटो हा साधारण वर्षभरापूर्वीचा आहे. जो मागील वर्षीचा पोलादपूरमधील असल्याचं समजतं आहे. पुरामधून एनडीआरएफने एका बाळाला वाचवलं होतं तो फोटो आता पुन्हा व्हायरल झाला.

दरम्यान याबाबत मुंबई Tak च्या प्रतिनिधीने डोंबिवली लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरक्षिक अर्चना दुसाने यांच्याशी याबाबत संपर्क साधून माहिती मिळविली. याविषयी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, दुर्दैवाने बाळ वाहून गेले आहे. जे अद्याप सापडू शकलेले नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT