Vijay Darda यांचे हात कोळसा घोटाळ्यात काळे, पिता-पुत्राचा ‘इतकी’ वर्ष तुरुंगात मुक्काम
Imprisonment to former rajya sabha mp Vijay Darda: कोळसा घोटाळा प्रकरणी विशेष कोर्टाने विजय दर्डा यांच्यासह सहा जणांना शिक्षा सुनावली आहे. यापैकी दर्डा पिता-पुत्राला 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: कोळसा घोटाळा (Coal Scam) प्रकरणी दोषी आढळलेले राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) यांना विशेष कोर्टाने तब्बल 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा (Devendra Darda) याला देखील कोर्टाने 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेड या कंपनीचे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना देखील 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (special court sentences 4 years imprisonment to former rajya sabha mp Vijay darda son devender darda coal scam)
ADVERTISEMENT
माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि या प्रकरणातील दोषी अन्य सनदी अधिकाऱ्यांना 3-3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व दोषींवर गुन्हेगारी कट रचणं आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. ज्यामध्ये दोषी आढळल्याने कोर्टाने त्यांच्याविरोधात आता शिक्षा सुनावली आहे. यामुळे दर्डा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
कोर्टाने विजय दर्डांना नेमक्या कोणत्या प्रकरणात सुनावली शिक्षा?
विजय दर्डा हे राज्यसभेचे माजी खासदार होते. तसंच लोकमत समूहाचे ते महत्त्वाचे घटक आहेत. त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणांना दिल्लीच्या सीबीआय विशेष कोर्टाने दोषी ठरवलं होतं. आज (26 जुलै) शिक्षेची सुनावणी झाली आहे. जेएलडी यवतमाळ एनर्जी या कंपनीला छत्तीसगडमधील फरीदाबाद येथे खाण कंत्राट मिळवून देताना काही गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याच प्रकरणातील ही शिक्षा आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Raj Thackeray : ‘हे नितीन गडकरींचं अपयश, महाराष्ट्राचं दुर्दैव’, राज ठाकरे का भडकले?
आधीचं जे खाण वाटप होतं.. 1999 ते 2005 च्या दरम्यान झालेलं या कंपनीला.. ते लपवून नवी कंत्राटं मिळविल्याचा आरोप यात करण्यात आलेला होता. या संपूर्ण प्रकरणात खरं तर यूपीएच्या काळात जी प्रमुख प्रकरणं गाजली होती घोटाळ्याची.. त्यात कोळसा खाणीचं प्रकरणं हे प्रमुख होतं.
याच कोळसा खाणीच्या प्रकरणातील ही तेरावी शिक्षा आहे. 4 वर्षांचा तुरुंगवास जो आहे तो ठोठवण्यात आला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाची ही शिक्षा आहे. पण ज्या कलमांच्या अंतर्गत त्यांना दोषी ठरविण्यात आलं होतं त्यामध्ये कमीतकमी सहा महिने आणि जास्तीत जास्त 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यापैकी 4 वर्षांच्या शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कोर्टाने कोणा-कोणाला ठरवलेलं दोषी?
विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी कोळसा घोटाळ्यात दर्डा यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, (Devendra Darda) केएस क्रोफा आणि केसी समरिया, मेसर्स जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना आयपीसी कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचाराशी संबंधित कलमांखाली दोषी ठरवले आहे.
ADVERTISEMENT
न्यायालयाने आरोपींना गुन्हेगारी कट रचणे (IPC कलम 120-B अंतर्गत शिक्षापात्र) आणि फसवणूक (IPC कलम 420 अंतर्गत शिक्षापात्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांसाठी दोषी ठरवलं आहे. या प्रकरणातील शिक्षेवर 18 जुलै रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे.
हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची चंद्रशेखर बावनकुळेंनी उडवली खिल्ली; म्हणाले…
तत्कालीन राज्यसभा सदस्य दर्डा यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये तथ्य चुकीचे मांडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. डॉ.मनमोहन सिंग यांच्याकडे त्यावेळी कोळसा मंत्रालयाचा कारभार होता.
10 नोव्हेंबर 2016 रोजी येथील विशेष न्यायालयाने विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जयस्वाल, माजी कोळसा सचिव गुप्ता, केसी समरिया आणि केएस क्रोफा यांच्यावर या सगळ्यांविरोधात विविध कलमांखाली आरोप निश्चित केले होते.
दरम्यान, विशेष कोर्टाने आता शिक्षा सुनावल्यानंतर दर्डा आणि इतर दोषींकडे हायकोर्टात जाण्याचा पर्याय आहे. त्यामुळे याबाबत पुन्हा नव्याने सुनावणी होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT