Jalna Maratha Akrosh Morcha : ‘त्या’ घटनेनंतर कुठे तणाव, तर कुठे आंदोलन; पवार आंदोलकांना भेटणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jalna maratha andolan visit sharad pawar
Jalna maratha andolan visit sharad pawar
social share
google news

Jalna Maratha Akrosh Morcha : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी जिल्ह्यात मराठा आक्रोश मोर्चावर (Maratha Akrosh morcha) पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या लाठीचार्जमध्ये आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील () यांच्यासह अनेक स्त्री-पुरुष जखमी झाले. अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाल्याचे वृत्त पसरताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेमुळे सत्ताधारी आणि गृह खात्यावर ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. हे प्रकरण शांत नाही झालं तर मला आंदोलनकर्त्यांची भेट घ्यावी लागेल असा सूचक इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आज शरद पवार (sharad pawar) आणि भाजपचे खासदार उदयनराजे आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत. (tense calm after lathi charge maratha kranti morcha protest in Jalna, sharad pawar meet protesters)

ADVERTISEMENT

तीव्र पडसाद

राठा आक्रोश मोर्चावर लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यभरातून त्यावर आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलनकर्त्यातून तीव्र पडसाद उमटत आहेत. लाठीचार्ज झाल्यानंतर अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहेत. त्यामुळे आज आंदोलनाचा कोणताही परिणाम वाहनांवर होऊ नये यासाठी जालन्यासह या भागातील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

राजकीय वातावरण तापले

मराठा आक्रोश मोर्चावर लाठीचार्ज झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर वेगवेगळे पडसाद उमटत असल्याने प्रशासनाकडूनही शांततचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरात वेगवेगळे पडसाद उमटत असतानाच मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याचे सांगितले आहे.

हे वाचलं का?

अनेक बसफेऱ्या रद्द

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर आज जालन्याच्या जाफ्राबादमध्ये आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या संघटनेकडून निषेध व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा आंदोलकांकडून निषेध व्यक्त केला जात असून नंदूरबार, संभाजीनगर, जालना बस बंद असणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

तणावपूर्ण शांतता

या घटनेमुले जालना जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता पसरली असून अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर आज बीड जिल्ह्यात बंदचं आवाहन करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

14 बस पेटवल्या

आज शरद पवारांचा जालना दौरा असल्याने राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. त्याच बरोबर शरद पवार आज आंदोलकांचीही भेट घेणार आहेत. अंतरवाली सराटीत मराठा समाजाचं आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या 14 बस पेटवण्यात आल्या आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांची जाळपोळ झाल्यामुळेच या मार्गावर आता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे नंदुरबारमध्येही बंदच आवाहन करण्यात आले असून परभणी जिल्ह्यात एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT