Rain Update: मुंबईसह महाराष्ट्रात तुफान पाऊस, पुन्हा ऑरेंज-रेड अलर्ट जारी

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Due to torrential rains in many parts of the state including Mumbai since last night, flood situation has arisen in many places. Also, the Meteorological Department has predicted the possibility of very heavy rain in some districts in the next 24 hours.
Due to torrential rains in many parts of the state including Mumbai since last night, flood situation has arisen in many places. Also, the Meteorological Department has predicted the possibility of very heavy rain in some districts in the next 24 hours.
social share
google news

मुंबई: मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) काल (21 जुलै) रात्रीपासून तुफान पाऊस (Rain) बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. आजही (22 जुलै) या भागासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज हे बंद राहणार आहेत. जुलै महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक 1000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. (torrential rains in many parts of state including mumbai last night flood situation meteorological department predicted possibility of very heavy rain in some districts in next 24 hours)

ADVERTISEMENT

सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतील अंधेरी, वांद्रे आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. तसंच ज्या पद्धतीने हवामान खात्याने इशारा दिला आहे त्यानुसार पुढील काही तासात मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबई आणि उपनगरांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे त्याच अनुषंगाने सर्व यंत्रणा प्रशासनाकडून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

भिवंडीत पूर परिस्थिती

भिवंडीतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे भिवंडीत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.या पावसामुळे भिवंडीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून त्यामध्ये अनेक वाहनंही बुडाली आहेत. मध्यरात्रीपासून भिवंडी आणि परिसरात मुसळधार पाऊस बरसत असल्याने आता येते पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Kalyan: ‘नात माझ्याकडून सटकली अन् नाल्यात…’, ‘तेव्हा’ काय घडलं आजोबांनी सांगितलं!

तीन बत्ती, भाजी मार्केट या भागात कंबरेहून अधिक पाणी साचल्याने येथील अनेक दुकानांमथध्ये पाणी शिरलं आहे. तसंच मुख्य रस्त्यावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे.

ADVERTISEMENT

पालघरला रेड अलर्ट, प्रशासन यंत्रणा सज्ज

वसई-विरार परिसरात देखील कालपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसर देखील पाण्याखाली गेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावासाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे वसई-विरारमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 24 तासात पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रकिनारी असणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच येथील प्रशासन यंत्रणेला देखील सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Irshalwadi Landslide : शोध सुरू, पण आशा मावळल्या! इर्शाळवाडीत काय सुरूये?

मराठवाडा-विदर्भातही तुफान पाऊस

यवतमाळ, अकोला, बुलढाणा यासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस सध्या बरसत आहे. त्यामुळे अनेक नदी नाले हे ओसंडून वाहत आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांचं नुकसान झालं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT