‘…त्याचे प्रायश्चित तुम्ही घेणार आहात का?’, ठाकरेंचा फडणवीसांना रोकडा सवाल

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

nagpur rains : Shiv Sena slams devendra fadnavis rss And bjp.
nagpur rains : Shiv Sena slams devendra fadnavis rss And bjp.
social share
google news

Uddhav Thackeray vs Devendra fadnavis, Saamana Editorial : “नागपूरच्या विकासाच्या गप्पा शेवटी ‘गोलगप्पा’च ठरल्या या वस्तुस्थितीचे काय? नागपूरच्या विकासाचा ठेका आणि मक्ता ज्या स्वयंघोषित ठेकेदारांकडे वर्षानुवर्षे आहे, त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?”, असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरलं. (Shiv Sena has criticized Devendra Fadnavis over the Nagpur Flood.)

नागपूरमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला काही सवाल केले आहेत.

‘नागपूर कोणी बुडवले?’, असा सवाल करत सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत पाणी साचल्यानंतर भाजपकडून होणाऱ्या टीकेवरू सामनातून उलट सवाल करण्यात आलाय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नागपूरचे सुपुत्र…

सामना अग्रलेखात म्हटलंय की, “राज्याच्या दोन ‘उपप्रमुखां’पैकी सीनियर देवेंद्र फडणवीस स्वतःला नागपूरचे सुपुत्र समजतात. मात्र नागपूर महापुराच्या पाण्यात गटांगळ्या खात असताना, त्यात सापडलेले पूरग्रस्त मदतीसाठी टाहो फोडत असताना हे सुपुत्र मुंबईत केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर गणेश दर्शन घेत होते, बंद खोलीत चर्चा करीत होते.”

हेही वाचा >> ‘आता गप्प का?’, शरद पवारांमुळे राहुल गांधी खिंडीत, नेमकं काय घडलं?

“पावसाने, महापुराने व्हायचे ते नुकसान झाल्यावर ते त्यांच्या होम टाऊनमध्ये गेले. पूरग्रस्त भागाचा दौरा, पाहणी, पूरग्रस्तांच्या गाठीभेटी, नुकसानभरपाईचे आश्वासन हे नेहमीचे सोपस्कार पार पाडले. पूरग्रस्तांसाठी हे सगळे तर होणारच, परंतु सरकार म्हणून आणि नागपूरचे स्वयंघोषित विश्वस्त म्हणून तुम्ही आतापर्यंत जे दिवे लावलेत ते या महापुराने विझवले, त्याचे काय?”, असा सवाल शिवसेनेने (युबीटी) फडणवीसांना केला आहे.

ADVERTISEMENT

नागपुरकरांवर ही वेळ का आली? ठाकरे गटाचा सवाल

मुंबईत पाणी साचल्यानंतर भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य केलं गेलं. आता नागपूरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर ठाकरे गटाने फडणवीसांसह संघालाही कोंडीत पकडलं. “एरवी मुसळधार पावसाने मुंबईत पाणी साचले की, शिवसेनेकडे बोट दाखविणारे तुम्हीच आहात ना? मग आता ज्या नाग नदीतून बोटी चालविण्याचे स्वप्न तुम्ही दाखविले त्याच नाग नदीत हजारो कुटुंबांची घरेदारे, संसार, गाड्या वाहून जाताना पाहण्याची वेळ नागपूरकरांवर का आली? त्यासाठी कोणाकडे बोट दाखवायचे?”, असा सवाल सेनेने (युबीटी) केला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Women Reservation Bill : लोकसभा, विधानसभेच्या जागांचं समीकरण बदलणार; विधेयकात काय?

“नाग नदीच्या महापुरात तुमच्या तथाकथित विकासाचा आज चिखल झाला आहे आणि त्या चिखलात सामान्य नागपूरकर आपले किडुकमिडुक शोधत वणवण फिरत आहेत. त्याचे काय प्रायश्चित्त तुम्ही घेणार आहात?”, असा रोकडा सवाल शिवसेनेने (युबीटी) केला आहे.

“मुंबईला जशी भौगोलिक मर्यादा आणि सागरी निर्बंध आहेत, दाटीवाटीची लोकवस्ती आहे तसे नागपूरबाबत नाही. तरीही तुमचे तेथील विकासाचे मॉडेल शनिवारच्या महापुरात वाहून गेले. केवळ चार तासांच्या पावसात नागपूर बुडाले. त्यात तुमच्या विकासाच्या थापा गटांगळ्या खाताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.”

“या महापुराने नागपूरच्या स्वयंघोषित ठेकेदारांचा मुखवटाही गळून पडला. आता तरी ते आणि त्यांचा ‘परिवार’ काही ‘चिंतन’ करणार आहेत का? मुंबई तुंबली म्हणून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्यांचे आता नागपूरचे ‘तुंबापूर’ झाले यावर काय म्हणणे आहे? नागपूर कोणी बुडवले? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. त्याचे आधी उत्तर द्या आणि मगच नागपूरच्या विकासाच्या वल्गना करा”, अशा शब्दात ठाकरे गटाने फडणवीस, भाजप आणि संघावर तोफ डागली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT