नवरदेव पोहोचलाच नाही, नवरीचं भाऊजींशी लग्न! काय आहे अजब लग्नाची गजब गोष्ट?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uttarpradesh News : उत्तरप्रदेशच्या (Uttarpradesh) झाशी (Jhansi) येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजने अंतर्गत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जिथे नवरदेवाच्या अनुपस्थितीत नवरीने आपल्या भाओजीसोबतच सात फेरे घेतले आहेत. पण जेव्हा हा प्रकार उघडकीस आला त्यावेळी नवरीने घाईघाईने आपल्या भांगेत भरलेलं सिंदूर पुसून टाकलं. याबाबत समाजकल्याण अधिकारी ललिता यादव म्हणाल्या की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली असून, चौकशी केली जाईल.

हे संपूर्ण प्रकरण झाशी येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानात घडलं आहे. येथे गेल्या मंगळवारी (27 फेब्रुवारी) सामूहिक विवाह योजनेंतर्गत अनेक जोडपी लग्नबंधनात अडकली. मात्र, यावेळी एक नवरदेव घटनास्थळी न पोहोचल्याने नवरीचं चक्क तिच्या विवाहित भाओजीशी लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर लगेचच नवरीने भांगेतलं सिंदूर पुसून टाकलं. नंतर दोघांची एकांतात विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघड झाला. 

काय आहे नेमकं संपूर्ण प्रकरण?

27 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सामूहिक विवाह संमेलन होतं. या संमेलनात अनेक वधू-वर लग्नासाठी सहभागी झाले होते. त्यानंतर एका जोडप्याकडे तिथे उपस्थित असलेल्यांची नजर गेली असता प्रककरण संशयास्पद वाटले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बामोर, झाशी येथील रहिवासी असलेल्या खुशीचे (नवरी) लग्न मध्यप्रदेशातील छतरपूर येथील बृषभानसोबत ठरलं होतं. सामूहिक विवाह सोहळ्यातील त्यांचा नोंदणी क्रमांक 36 होता. खुशीने सात फेरे घेतल्यानंतर भांगेत भरलेलं सिंदूर आणि बिंदी पुसून टाकली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक बृषभानशी बोलले असता, त्याने आपलं नाव दिनेश असून तो छतरपूरचा नसून बामोरचा असल्याची कबुली दिली.

दिनेशने सांगितले की, 'लग्न बृषभानसोबत होणार होतं, पण तो आला नाही, म्हणून काही लोकांच्या सांगण्यावरून तो बृषभानच्या जागी नवरदेव बनला.' दिनेशने असंही सांगितलं की, 'तो आधीच विवाहित असून खुशी त्याची मेहुणी आहे.'

ADVERTISEMENT

जिच्यासोबत हा प्रकार घडला त्या नवरीचं म्हणणं काय?

या प्रकरणात नवरी खुशी कधी तिचं नाव छवी सांगते तर कधी दुसरंच काहीतरी. तिने सांगितलं की, होणारा पती (वर) त्या प्रसंगी पोहोचू शकला नाही. कारण, पाऊस पडत होता आणि तो खूप दूर रहातो. यामुळेच भाओजीसोबत लग्न केलं. खुशी पुढे म्हणाली, 'मला माहित आहे की हे चुकीचं आहे पण आम्हालाही समस्या होत्या. फॉर्म भरला होता, सर्व काही ऑनलाइन नोंदणी झाल्या होत्या. मी पण मंडपात पोहोचले होते. त्यामुळेच मला लग्न करावं लागलं.'

ADVERTISEMENT

दुसरीकडे, विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या समाजकल्याण अधिकारी ललिता यादव यांनी हे शक्य नसल्याचे सांगितले. 'खरंच ही फसवणूक असेल आणि तक्रार आली तर चौकशी करून कारवाई केली जाईल', असं त्या म्हणाल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT