Washim : अंघोळ करताना सोनं काढलं अन् गायब झालं, म्हशीच्या पोटात कसं सापडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

washim news buffalo swallowed gold animal doctor did operation and removed it
washim news buffalo swallowed gold animal doctor did operation and removed it
social share
google news

Washim Buffalo Swallowed Gold : वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका दाम्पत्याच्या घरातूनच अडीच तोळे सोने गायब झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दाम्पत्याने चोरीला गेलेल्या सोन्याचा शोध सुरु केला होता. हा शोध पुढे जाऊन त्याच्या म्हशीपर्यंत पोहोचला होता. यानंतर म्हशीला डॉक्टरांसमोर नेताच संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. डॉक्टरांनी म्हशीवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून अडीच तोळे सोने बाहेर काढले आहे. त्यामुळे आता दाम्पत्याने सुटकेचा श्वास सोडला आहे. (washim news buffalo swallowed gold animal doctor did operation and removed it)

वाशिम जिल्ह्यातील सरसी गावातील रामहरी नावाच्या शेतकऱ्याच्या पत्नीने आंघोळीला जात असताना आपले मंगळसूत्र एका ताटात काढून ठेवले होते. याच ताटात सोयाबीन आणि मूगाची साले देखील ठेवण्यात आली होती. त्यामध्ये मंगळसूत्रही दडले होते. आंघोळ करून झाल्यावर शेतकऱ्याच्या पत्नीने म्हशीसमोर खाऊचे तुकडे असलेले ताट ठेवले आणि घरातील कामे करायला सुरूवात केली.

हे ही वाचा :Deoria : पती-पत्नी, दोन मुली आणि मुलाचा चिरला गळा, झाडल्या गोळ्या; कारण…

तब्बल दीड ते दोन तासानंतर उलटल्यानंतर महिलेला गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले. यानंतर महिलेने घरात शोधाशोध सुरु केली होती. यावेळी खूप शोधाशोध केल्यावर त्यांना मंगळसूत्र ताटात ठेवल्याचे आठवले. त्यानंतर त्या धावत म्हशीजवळ गेल्या असता ताट संपूर्ण रिकामे करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हा संपूर्ण प्रकार पतीला सांगितला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान शेतकरी रामहरी भोयर यांनी तत्काळ वाशिमचे पशुवैद्यकीय अधिकारी बाळासाहेब कौंडाणे यांना संपूर्ण घटना फोनवर सांगितली. यावेळी डॉक्टर कोंडाणे यांनी तत्काळ म्हशीला वाशिमला आणण्याचा सल्ला दिला. शेतकरी रामहरी यांनी डॉक्टरांचा सल्ला मानत थेट म्हशीसह वाशिमचे पशुसंवर्धन कार्यालय गाठले. यावेळी डॉक्टरांनी मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने म्हशीच्या पोटाची तपासणी केली. या तपासात म्हशीच्या पोटात काहीतरी असल्याचे आढळून आले. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी म्हशीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा :आशिष शेलार पुन्हा म्हणाले, ‘आदू बाळ; कवितेतून आदित्य ठाकरेंच्या वर्मावर ‘बाण’

दुसऱ्या दिवशी म्हशीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत म्हशीला 65 टाके मारून तिच्या पोटातून सोन्याचे मगळसुत्र बाहेर काढण्यात आले. यामुळे दाम्पत्याने सुटकेचा श्वास सोडला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दरम्यान 65 टाक्यांचे ऑपरेशन करून म्हशीच्या पोटातून सोन्याचे मंगळसूत्र काढण्यात आले आहे. तसेच सर्व पशुपालकांना चारा किंवा इतर काही देताना थोडी सावधगिरी बाळगण्याची विनंती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब कौंडाणे यांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT