WhatsAppवर चॅटिंगची मजा आणखीणच वाढणार, काय आहे नवीन फिचर?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

whatsapp rolling out new feature animated avatar pack how to use it
whatsapp rolling out new feature animated avatar pack how to use it
social share
google news

Whatsapp rolling out animated avatar pack :  जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हाट्सअ‍ॅपने (whatsapp) आता युझर्ससाठी नवीन फिचर आणले आहे. या फिचरचे नाव अ‍ॅनिमिटेड अवतार पॅक (Animated Avtar Pack) आहे. या फिचरने युझर्सचा चॅटिंगचा अनुभव आणखीणच वाढणार आहे. दरम्यान आता या नवीन फिचरची माहिती Wabetainfoने शेअर केली आहे. आता हे नेमके फिचर काय आहे. हे फिचर युझर्सना कसे वापरता येणार आहे, याची माहिती जाणून घेऊयात. (whatsapp rolling out new feature animated avatar pack how to use it)

व्हाट्सअ‍ॅपने (whatsapp) युझर्ससाठी नवीन फिचर आणले आहे. या फिचरचे नाव अ‍ॅनिमिटेड अवतार पॅक (Animated Avtar Pack) आहे. हे फिचर आता व्हाट्सअ‍ॅप Beta अ‍ॅड्रॉईड 2.23.16.12 वर्जनवर उपलब्ध आहे. त्यामुळे हे फिचर सध्या काही युझर्सनाच वापरता येणार आहे, जे बीटा टेस्टर आहेत. या नवीन फिचर्ससाठी बीटा युझर्सना गुगल प्लेस्टोरवर जाऊन लेटेस्ट बीटा वर्जन अपडेट करता येणार आहे.

हे ही वाचा : Chandrayaan 3 In Moon’s Orbit:…तर चंद्रयान 10 दिवसात पृथ्वीवर परतणार

Wabetainfoने अ‍ॅनिमेटेड इमेज शेअर केली आहे. ज्यामध्ये अवतारचं वर्जन दाखवण्यात आले आहे.युजर्सना आता कोणत्याही चॅटींग दरम्यान अ‍ॅनिमेटेड अवतार पाठवता येणार आहे. Wabetainfoने याआधी य देखील या फिचर बद्दलची माहिती दिली होती. हे फिचर आता तयार होत आहे. या फिचरमध्ये डायनामिक इलेमेंट पाहायला मिळणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कस वापरता येणार फिचर?

व्हाट्सअ‍ॅप युझर्सना हे फिचर वापरण्यासाठी चॅटींगमध्ये जाऊन अवतार टॅबवर जावे लागणार आहे. जर त्या ठिकाणी अवतारचं अ‍ॅनिमेशन उपलब्ध असेल, तर याचा अर्थ युझर्सकडे अ‍ॅनिमेशन फिचर सूरू झाले आहे. आणि जर अवतार टॅबवर काहीच नसेल तर अद्याप हे फिचर सुरु झाले नाही आहे.

विशेष म्हणजे हे अ‍ॅनिमेशन अवतार समोरच्या व्यक्तीला पाठवताना त्याच्याकडे हे फिचर चालू नसले तरी त्याला ते अवतार मिळणार आहे. याचाच अर्थ नॉन बीटा वर्जन युझर्स देखील अ‍ॅनिमेटेड अवतार रिसीव्ह करू शकणार आहेत. त्यामुळे आता व्हाट्सअ‍ॅपवर चॅटींगचा अनुभव आणखीणच चांगला होणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : whatsapp scam : लाईक्स आमिष अन् ठाण्यातील व्यक्तीने गमावले 37 लाख, तुम्ही ही चूक करू नका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT