मेंढ्या चरायला नेल्या तेव्हाच फोन आला अन्... UPSC मध्ये यश मिळवलेला मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणे कोण?
मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणे या तरुणाने यूपीएससी परीक्षेत जे यश मिळवलं त्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जाणून घ्या कोण आहे बिरदेव डोणे.
ADVERTISEMENT

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील एका साध्या मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव सिद्धाप्पा डोणे हा सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याने UPSC परीक्षेत 551 वी रँक मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बिरदेवच्या या यशाने विशेषतः ग्रामीण आणि मागासवर्गीय समाजातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. त्याच्या यशाची गोष्ट ही कठोर परिश्रम, जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची कहाणी आहे.
संकटांवर मात आणि UPSC मध्ये यश
बिरदेवचा जन्म यमगे गावात एका धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबात झाला. त्याचे वडील सिद्धाप्पा डोणे आणि कुटुंब मेंढ्या चारण्याचे पारंपरिक काम करतात. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, आणि अभ्यासासाठी आवश्यक पोषक वातावरण किंवा सुविधांचा अभाव होता. घरात वीज, पक्के घर, किंवा आधुनिक साधनसामग्री नव्हती. तरीही, बिरदेवने लहानपणापासूनच शिक्षणाची आवड जोपासली आणि UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं
हे ही वाचा>> UPSC 2024: यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आणि देशात तिसरा आलेला आर्चित डोंगरे आहे तरी कोण?
त्याने यमगे येथील विद्यामंदीर शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनातच तो बुद्धिमान आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे त्याने कोल्हापूर येथील एका महाविद्यालयातून अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) मध्ये पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर काही काळ त्याने नोकरीचा विचार केला, परंतु त्याच्या मनात UPSC परीक्षा देण्याचा विचार होता. वडिलांनी नोकरी करण्याचा सल्ला दिला, कारण यूपीएससीच्या तयारीसाठी लागणारा खर्च (महिन्याला 10-12 हजार रुपये) कुटुंबाला परवडणारा नव्हता. तरीही, बिरदेवने आपल्या ध्येयावर ठाम राहून यूपीएससीची तयारी सुरू केली.

यूपीएससीचा प्रवास
यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे. बिरदेवसाठी ही तयारी सोपी नव्हती. त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला










