UPSC Chairman : पूजा खेडकरांमुळे वादात सापडलेल्या 'यूपीएससी'ची सूत्रे IAS महिलेच्या हाती
Upsc Chairman Preeti Sudan : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे वादात सापडलेल्या यूपीएससी आयोग वादात सापडला आहे. आयोगाच्या अध्यक्षपदी आता प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान
मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवी नियुक्ती
कोण आहेत यूपीएससीच्या अध्यक्ष प्रीती सुदान?
Who is upsc chairman preeti sudan : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे केंद्रीय लोक सेवा आयोगाबद्दल शंका उपस्थित झाल्या. अनेक प्रकरणे सोशल मीडियातून मांडली गेली. या सगळ्यात मनोज सोनी यांनी यूपीएससी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान या भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत होत्या. (Preeti Sudan appointed as chairperson of UPSC)
ADVERTISEMENT
1983 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांच्याकडे केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत प्रीती सुदान?
प्रीती सुदान या मूळच्या हरयाणाच्या रहिवासी आहेत. 1983 मध्ये प्रीती सुदान या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि आयएएस बनल्या. प्रीती सुदान यांनी महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालय, रक्षा मंत्रालय,सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिव म्हणून काम केलेले आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, वाचा काय आहेत नव्या अटी शर्ती?
आंध्र प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी राहिलेल्या प्रीती सुदान या 2020 मध्ये केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्यांना ३७ वर्षांचा भारतीय प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे.
ई-सिगारेट बंदीचा घेतला होता निर्णय
प्रीती सुदान यांचे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान', 'आयुष्मान भारत मिशन', राष्ट्रीय आरोग्य आयोग आदीमध्ये मोठे योगदान राहिलेले आहे. प्रीती सुदान यांनी ई-सिगारेटवर बंदी घालणाऱ्या कायदा तयार केला होता.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> पूजा खेडकरांचा अहवाल समितीकडे सूपूर्द, IAS ची नोकरी जाणार?
प्रीती सुदान यांचे शिक्षण किती?
प्रीती सुदान यांनी अर्थशास्त्रामध्ये एम. फिलची पदवी घेतली आहे. त्याचबरोबर लंडनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल सायन्सेस मधून सामाजिक शास्त्र शाखेतून एम.एससीची पदवी घेतली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT