Sushma Andhare : “वहिनी, एक शब्द देतेय…”, रश्मी ठाकरेंना अंधारेंनी काय दिलं वचन?
रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुषमा अंधारेंनी लिहिली खास पोस्ट. सुषमा अंधारेंनी रश्मी ठाकरेंचे कौतुक केले. त्याचबरोबर कायम शिवसेनेसाठी लढत राहीन असा शब्द सुषमा अंधारेंनी रश्मी ठाकरेंना दिला.
ADVERTISEMENT

Sushma Andhare wishes to Rashmi Thackeray on her birthday : ‘रश्मी वहिनी, तुम्ही उद्धव ठाकरे नावाच्या गलबाताला कायम समजून घेणारं बंदर आहात. तुम्ही माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्यानंतर मातोश्री आणि तमाम शिवसैनिकांच्या साठीचं ऊर्जाकेंद्र आहात’, अशा शब्दात रश्मी ठाकरेंचे कौतुक करत शिवसेना (युबीटी) उपनेता सुषमा अंधारेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. सुषमा अंधारेंनी वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या या पोस्टमधून रश्मी ठाकरेंना एक वचनही दिलं. (Sushma Andhare praises Rashmi Thackeray on her birthday)
रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुषमा अंधारेनी लिहिलेली पोस्ट
प्रिय रश्मी वहिनी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
तुमचा माझा परिचय तसा प्रत्यक्ष मागील 14 महिन्याचा. पण त्याच्याही खूप आधीपासून तुम्ही मनात घर करून आहात. तुमची पहिली छबी मनाला प्रचंड भावली होती ती सन्माननीय पक्षप्रमुखांच्या समवेत मुख्यमंत्री म्हणून शपथविधी समारंभातला तुमचा अत्यंत रुबाबदार आणि तितकाच सोज्वळ लाघवी वावर…
तितक्याच खंबीर आणि संयमी तुम्ही दुसऱ्यांदा महाराष्ट्रला दिसल्या त्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन साहेब वर्षाच्या पायऱ्या उतरून खाली उतरत होते तेव्हा त्यांच्या पाठोपाठ चालतानाचा…