Ajit Pawar: गोविंदांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घेतला

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर केली टीका
decision to give reservation to Govinda in Government jobs was taken by the Chief Minister emotionally Says Ajit Pawar
decision to give reservation to Govinda in Government jobs was taken by the Chief Minister emotionally Says Ajit Pawar

गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक होऊन घेतला. मुख्यमंत्री झाल्यावर असं भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात. प्रशासनिक बाबी लक्षात न घेता त्यांनी हा निर्णय घेतला अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरमध्ये केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या निमित्ताने नागपूर विमानतळावर अजित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर टीका केली.

मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ऑगस्टला काय घोषणा केल्या?

दहीहंडीमधील गोविंदांना इथून पुढे खेळाडूंचा दर्जा दिला जाणार आहे. तसेच या सर्व गोविंदांना बाकी खेळाडूंना ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा लागू होणार आहेत. त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ज्याप्रमाणे राज्यात प्रो-कब्बडी, प्रो-कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात त्याप्रमाणे प्रो- गोविंदा स्पर्धा देखील घेतल्या जाणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर भावनिक होऊन असे निर्णय घ्यायचे नसतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?

दहीहंडी उत्सव आणि गोविंदांना आरक्षण देण्याबाबत अजित पवार यांनी भाष्य केलं."उद्या दहीहंडी आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल आपली भूमिका मांडली, असं म्हणत अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. सोमवारी मी अधिवेशनात याबद्दल बोलणार आहे. गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली, तेव्हा मी प्रश्न केले नाही. मात्र, दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांचं रेकॉर्ड कसं काय ठेवणार? त्यांच्या पात्रतेबद्दल माहिती कशी ठेवणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठाणे शहराचं प्रतिनिधीत्व करतात तिथे तिथे गोविंदांची संख्या जास्त आहे. त्या गोविंदांना मला नाउमेद करायचं नाही, पण उद्या गोविंदांना आरक्षण देऊन नोकरी देणार, मात्र जी मुलं-मुली स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करतात, त्यांचे काय याबद्दल भूमिका नाही असंही अजित पवार यांनी नागपूरमध्ये म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in