‘…त्याचे प्रायश्चित तुम्ही घेणार आहात का?’, ठाकरेंचा फडणवीसांना रोकडा सवाल
nagpur Rains : नागपूरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना घेरलं आहे. नागपुरातील विकास कुठे गेला, असा सवाल शिवसेनेने केलाय.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray vs Devendra fadnavis, Saamana Editorial : “नागपूरच्या विकासाच्या गप्पा शेवटी ‘गोलगप्पा’च ठरल्या या वस्तुस्थितीचे काय? नागपूरच्या विकासाचा ठेका आणि मक्ता ज्या स्वयंघोषित ठेकेदारांकडे वर्षानुवर्षे आहे, त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?”, असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरलं. (Shiv Sena has criticized Devendra Fadnavis over the Nagpur Flood.)
नागपूरमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला काही सवाल केले आहेत.
‘नागपूर कोणी बुडवले?’, असा सवाल करत सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत पाणी साचल्यानंतर भाजपकडून होणाऱ्या टीकेवरू सामनातून उलट सवाल करण्यात आलाय.
नागपूरचे सुपुत्र…
सामना अग्रलेखात म्हटलंय की, “राज्याच्या दोन ‘उपप्रमुखां’पैकी सीनियर देवेंद्र फडणवीस स्वतःला नागपूरचे सुपुत्र समजतात. मात्र नागपूर महापुराच्या पाण्यात गटांगळ्या खात असताना, त्यात सापडलेले पूरग्रस्त मदतीसाठी टाहो फोडत असताना हे सुपुत्र मुंबईत केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर गणेश दर्शन घेत होते, बंद खोलीत चर्चा करीत होते.”