हात, पाय, डोकं धडावेगळं केलेल्या खुनाचा असा झाला उलगडा; बापानेच केला मुलाचा खात्मा

अहमदाबादच्या वसना परिसरात डोकं, हात आणि पाय नसलेल्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.
हात, पाय, डोकं धडावेगळं केलेल्या खुनाचा असा झाला उलगडा; बापानेच केला मुलाचा खात्मा

गुजरात: अहमदाबादच्या वसना परिसरात डोकं, हात आणि पाय नसलेल्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेच्या ५ दिवसांनंतर आता वसनापासून ३ किमी अंतरावर असलेल्या एलिसब्रिज परिसरात मृतदेहाचे पाय सापडले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे. हा मृतदेह हितेश नावाच्या तरुणाचा असून त्याच्या वृद्ध वडिलांनीच त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

पाच दिवसांपूर्वी वसना परिसरात पोलिसांना एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता, ज्याला ना डोकं, ना पाय, ना हात होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तपास सुरू असतानाच, वासनापासून तीन किमी अंतरावर असलेल्या एलिसब्रिज परिसरात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून त्या व्यक्तीचे पाय पॉलिथिनमध्ये सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सुरुवातीला पोलिसांना संशय आला की, हा पाय त्याच मृतदेहाचा असावा, जो 5 दिवसांपूर्वी वासनातून सापडला होता. त्यामुळे तपास सुरू असताना त्यांनी एलिसेब्रिज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. सीसीटीव्हीमध्ये स्कूटरवरून जाणारा एक वृद्ध पॉलिथिन फेकताना दिसत आहे. पोलिसांनी स्कूटरचा नंबर काढला. पोलीस जेव्हा स्कूटर मालकापर्यंत पोहोचले तेव्हा त्याने ही स्कूटर अंबावाडी परिसरातील एका वृद्धाला विकल्याचे समजले.

वृद्धाच्या घरातून सापडले चाकू आणि रक्ताचे डाग

संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्कूटर वापरणाऱ्याच्या घरी पोहोचले. येथे मोठा मुलगा हितेशसोबत वृद्ध राहत असल्याची माहिती मिळाली. हितेशबद्दल बरेच दिवस काहीच माहीत नसल्याचे वृद्धाने सांगितले. पोलिसांनी वृद्धाच्या घराची झडती घेतली असता घरातून धारदार चाकू आणि रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी तातडीने वृद्धाला ताब्यात घेतले.

मृतदेहाचं डोकं व हात कुठं आहेत?

सीसीटीव्ही फुटेजही पुन्हा तपासणी केली असता त्यातही तोच वृद्ध दिसत होता. पाच दिवसांपूर्वी वासना परिसरातून सापडलेल्या मृतदेहाचे हे पाय असल्याची खात्री पटली आहे. चौकशीत असे आढळून आले आरोपी एम. जानी हे वर्ग-2 चे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. तो ज्या घरात राहतो, त्याच घराच्या तळमजल्यावर त्याची बहीणही राहते. त्याची पत्नी मृत पावलेली आहे.

पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह हितेशचाच असल्याची पुष्टी झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वृद्धाची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे. वडिलांनी मुलाची हत्या का केली याचा शोध घेतला जात आहे. यासोबतच त्याने मृतदेहाचे डोके व हात कुठे फेकले याचाही शोध घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in