Jaipur Mumbai train firing: बुरखाधारी महिलेला म्हणायला लावलं ‘जय माता दी’, CCTV त कैद
31 जुलै रोजी जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाला. या वेळी आरोपी चेतनसिंह चौधरी याने एका बुरखाधारी महिलेला बंदुकीचा धाक दाखवून जय माता दी असे म्हणायला लावले.
ADVERTISEMENT

Jaipur Train Firing : 31 जुलै रोजी सकाळी जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये जे काही घडले त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. आता या प्रकरणाच्या तपासात नवीन माहिती समोर आलीये. 31 जुलै रोजी याच ट्रेनमध्ये चार जणांच्या हत्येचा आरोप असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंग चौधरीने बंदुकीच्या जोरावर एका बुरखाधारी महिलेला ‘जय माता दी’ म्हणण्यास भाग पाडले होते, असे तपासात समोर आले आहे. (RPF constable Chetan Singh Chowdhary : the woman has told the investigators that Chetan Singh forced the woman to say ‘Jai Mata Di’ at gunpoint)
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या बोरिवली गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) मधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलीये. पीडित महिलेचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
जयपूर एक्स्प्रेसमधील घटना सीसीटीव्हीत कैद
मिळालेल्या माहितीनुसार, जीआरपी अधिकाऱ्यांनी महिलेची ओळख पटवली असून तिचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात या महिलेला महत्त्वाची साक्षीदार करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
वाचा >> Nawab Malik : ना अजित पवार, ना शरद पवार… मलिकांचा नेमका ‘गेम’ काय?
या घटनेत चेतनसिंग चौधरीने आपले वरिष्ठ सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा आणि तीन रेल्वे प्रवाशांची हत्या केली. अब्दुल कादर, सय्यद सैफुद्दीन आणि असगर अब्बास शेख अशी या प्रवाशांची नावे आहेत.