Sangli: ‘त्या’ महिलेच्या घरात असतानाच गुंड सच्या टारझनची आधी बोटं तोडली अन्..
सांगलीतील कुख्यात गुंड सचिन जाधव याची एका 19 वर्षीय तरुणाने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. अनैतिक संबंधाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

प्रबोधिनी चिखलीकर, सांगली: सांगलीतील (Sangli) कुख्यात गुंड सच्या टारझन उर्फ सचिन जाधव (Sachin Jadhav) याची काल (24 जुलै) धारदार शस्त्राने डोक्यात व मानेवर वार करुन अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणी हल्लेखोर गणेश मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक दाद्या सावंत यांच्या खूनप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या सच्या टारझन नुकताच जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर त्याला सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला आहे. सच्या टारझन याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी वसुली असे अनेक गुन्हे दाखल होते. (sachya tarzan aka sachin jadhav notorious gangster brutally murdered 19 year old youth dispute over immoral relationship sangli crime news)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाड येथील अहिल्यानगरमध्ये आलेल्या सचिन जाधव याची कट रचून हत्या करण्यात आली. आरोपी गणेश मोरे (वय 19 वर्ष) याने सचिन जाधवची हत्या केल्याचं समोर आलं आहे. गणेशच्या नात्यातील एका महिलेसोबत सचिनचे अनैतिक संबंध होते. ज्याची माहिती ही गणेशला मिळाली होती. याच रागातून गणेशने सचिनची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.
हे ही वाचा >> Manipur : ‘जिवंत राहायचं असेल, तर कपडे काढ’, ‘त्या’ पीडितेने सगळंच सांगितलं
सचिन जाधव हा कुख्यात गुंड होता. जो मोक्का अंतर्गत गेले अनेक महिने तुरुंगात होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. याच दरम्यान, त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याच महिलेच्या घरी असताना अचानक आरोपी गणेश मोरे हा तिथे पोहचला. यावेळी सचिन हा झोपलेला होता. याचवेळी गणेशने आपल्यासोबत जो कोयता आणला होता त्या कोयत्याने त्याने त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये सुरुवातीला सचिनच्या हाताची बोटं तुटली. तसेच त्याच्या मानेवर आणि तोंडावर गंभीर वार झाले. ज्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला.
त्याला तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.