सना खान हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! पतीबरोबर आणखी एकाचा सहभाग, कोण आहे तो?
भाजप अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या पदाधिकारी सना खानची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पती अमित साहू उर्फ पप्पू याच्याबरोबर आणखी एकाचा समावेश आहे.
ADVERTISEMENT

Sana Khan News : महाराष्ट्रातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या सरचिटणीस सना खान जबलपूरमधून बेपत्ता झाल्या. पोलिसांत तक्रार आली आणि तपास सुरू झाला. त्यानंतर सना खानची हत्या करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले. या प्रकरणी जबलपूर आणि नागपूर पोलिसांनी आरोपी अमित उर्फ पप्पू साहूला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, अमितने सना खानची हत्या केल्याची कबुली दिली.
आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याने पोलिसांना सांगितले की, सना खानची रॉडने वार करून हत्या केली. यानंतर मृतदेह जबलपूरपासून 45 किमी अंतरावर असलेल्या हिरण नदीच्या पुलावरून फेकून दिला. अमितचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस आरोपीसह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
सना खान आणि अमित हे पती-पत्नी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून पैशांवरून वाद सुरू होता. सना खान अमितला भेटण्यासाठी नागपूरहून जबलपूरला गेली होती. बोलत असताना दोघांमध्ये वाद झाला आणि अमितने सनाच्या डोक्यात काठीने वार केले, त्यामुळे सनाचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वाचा >> पुण्यातील भाजपच्या नाराजी नाट्यावर नितीन गडकरींनी काढला मार्ग, काय घडलं?
सना खान 2 ऑगस्टला नागपूरहून जबलपूरला पोहोचली. यानंतर ती बेपत्ता झाली. हत्येचा संशय आल्याने सनाच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली. जबलपूरचे अतिरिक्त एसपी कमल मौर्य यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर जबलपूर आणि नागपूर पोलिसांनी मिळून सनाचा शोध सुरू केला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे सनाचा पती अमित याचा शोध घेतला आणि पकडले.