वकील महिलेची पूर्ण पाठ काळी-निळी केली, रिंगण करून मारलं.. आरोपी गावातीलच हैवान!
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका महिलेला गावातील सरपंच आणि काही लोकांनी अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बीड: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील गावातील गुंडांनी एका वकील महिलेला अत्यंत शुल्लक कारणावरून अत्यंत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या या महिलेला गावातील सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात मारहाण करण्यात आली आहे. रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेबाबत आता सवाल उपस्थित केला जात आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील आहे. पीडित महिला वकील, ज्ञानेश्वरी यांना गावातील मंदिरातील लाऊडस्पीकर आणि जवळील पीठाच्या गिरणीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. त्यांना मायग्रेन आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास असल्याने त्यांनी याबाबत गावातील सरपंच अनंत अंजाना यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी सरपंचाने कर्मचाऱ्याला सांगून आवाज कमी करू, असे आश्वासन दिले.
हे ही वाचा>> कराडच्या Encounter चा दावा, EVM मशीन आणि मुंडेंवर खळबळजनक आरोप करणारा पोलीस रणजीत कासलेची A to Z माहिती
मात्र, आवाज कमी न झाल्याने ज्ञानेश्वरी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन पुन्हा विनंती केली. कर्मचाऱ्याने नॉनव्हेज खाल्ल्याने मंदिरात जाऊ शकत नाही, असे सांगत आवाज लाऊडस्पीकरचा कमी करण्यास नकार दिला. यानंतर, ज्ञानेश्वरी यांनी पोलिसांना फोन करून तक्रार नोंदवली. ज्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून लाऊडस्पीकरचा आवाज बंद केला.
याच रागातून ज्ञानेश्वरी यांना अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर ज्ञानेश्वरी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे तिच्यावर तात्पुरते उपचार करून घरी सोडण्यात आलं.