Ambernath Crime: मेव्हण्याने भाऊजीचं गुप्तांगच कापलं, कोयत्याने निर्घृण हल्ला; नेमकं काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

ambernath crime wife brother made a fatal attack on her husband sickle attacked him and cut his genitals
ambernath crime wife brother made a fatal attack on her husband sickle attacked him and cut his genitals
social share
google news

Crime News: अंबरनाथ: सख्ख्या बहिणीला नांदवत नसल्याच्या रागातून मेव्हणाने (Brother-in-law) आपल्या भाऊजीच्या (Sisters Husband) गुप्तांगावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये (Ambernath) घडल्याचं समोर आलं आहे. 22 वर्षीय मेव्हण्याने अचानक केलेल्या हल्ल्यात 34 वर्षीय भाऊजी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेने अंबरनाथमध्ये एकच खळबळ माजली आहे. (ambernath crime wife brother made a fatal attack on her husband sickle attacked him and cut his genitals)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

बहिणाला नांदवण्यास तिच्या पतीने नकार दिल्याने संतापलेल्या 22 वर्षीय मेहुण्याने भाऊजीच्या गुप्तांगावर आणि हातावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील कमलाकार नगरमधील एका घरात घडली आहे.

याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पीडित तरुणाचे सासरे चिंतामण रामदास कनोजिया (वय 45 वर्ष) मेव्हणा संतोष रामदास कनोजिया ( वय 46) मेहुणा, साहिल चिंतामणी कनोजिया (वय 22) जखमीची पत्नी, प्रियंका कनोजिया ( वय 28 वर्ष) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. तर बिपीन चौधरी (वय 34 वर्ष) असे गुप्तांगावर कोयत्याने वार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Crime : महिलेच्या डोक्यात वासनेचं भूत, पतीला पाजायची अंमली दूध; नंतर दिरासोबत…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी बिपीन हा अंबरनाथ पश्चिम भागातील कमलाकार नगरमध्ये राहत असून तो एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपी चिंतामण यांची मुलगी प्रियंका हिचा विवाह बिपिनशी झाला होता. मात्र, विवाहाच्या काही महिन्यानंतर पती-पत्नीमध्ये घरगुती वाद होत असल्याने दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून सतत भांडण होत होती. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून प्रियंका ही माहेरी राहण्यास आली होती.

अखेर दसऱ्याच्या दिवशी 24 ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास चारही नातेवाईक आरोपी हे बिपीनच्या घरी आले होते. त्यावेळी सासरा चिंतामणी याने माझ्या मुलीला नांदण्यास का घेऊन जात नाही? असा सवाल विचारत जावई बिपीनला धमकवण्यास सुरुवात केली. ज्यामुळे दोघांमध्ये बराच वाद झाला. त्यानंतरही बिपीनने पत्नीस नांदवणार नाही असं म्हणत स्पष्ट शब्दात नकार दिला. यानंतर प्रियंकाचा भाऊ संतोष (मेव्हणा) याने थेट लोखंडी रॉडने बिपीनच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्याला गंभीर जखमी केलं.

ADVERTISEMENT

दुसरा मेहुणा साहिल याने थेट कोयत्याने भावजीवर हल्ला करत त्याच्या गुप्तांगावर आणि हातावर कोयत्याने सपासप वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा सगळा गोंधळ सुरू असतानाच बिपीनच्या शेजाऱ्यांनी तात्काळ त्याच्या घरी धाव घेतली. ज्यामुळे आरोपींनी घटनास्थळावरून लागलीच पळ काढला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> बँक मॅनेजर हत्याकांड: भावासाठी करणार होता ‘ती’ गोष्ट, पत्नीने जीवच घेतला!

दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतच बिपीनला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत बिपीनच्या तक्रारीवरून चारही हल्लेखारांवर भादंवि कलम 307, 326, 324, 506 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्याशी संपर्क साधला असता, बिपीनच्या तक्रारीवरून चार जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सासरा चिंतामणी आणि जखमीची पत्नी या दोघांना तात्काळ अटक केली आहे. तर मेव्हणा संतोष आणि साहिल फरार असून त्यांच्या शोधात 2 पोलीस पथके रवाना केली आहे. तसेच आज दोन्ही अटक आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. बी. मुंढे करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT