Anjali Murder Case : पोटच्या पोरीनेच प्रियकराच्या मदतीने काढला आईचा काटा, कारण…
अंजली यांची अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंड प्रखर गुप्ताने पोलिसांसमोर मोठे खुलासे केले आहेत. अंजली बजाज यांच्या हत्येचे षडयंत्र त्याच्याच मुलीने रचल्याची माहिती प्रखऱ गुप्ताने दिली आहे. त्यामुळे मुलीनेच आईच्या हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT

Anjali Murder Case : प्रेमात कधी कोण काय करून बसेल, याचा नेम नाही. कुणी प्रेमाखातर कुणाच्या जीवावर उठलं, तर कुणी स्वत: च आत्महत्या करेल, अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यात आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत पोटच्या पोरीने आईच्या हत्येचा कट रचल्याची घटना घडली आहे. बॉयफ्रेंडसह मिळून तिने हे सर्व कटकारस्थान रचलं होते. ते ही निव्वळ प्रेमाखातर. हे हत्याकांड होतं, अंजली बजाज हत्याकांड (Anjali Murder Case). या हत्याकांडात आता पोलिसांनी दोन तरूणांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरूणांनी आता अंजली बजाज हत्याकांडाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. (anjali murder case daughter along with her boyfried killed her mother agra shocking story)
काय आहे अंजली बजाज हत्याकांड ?
पोलिसांनी अंजली बजाज हत्याकांड (Anjali Murder Case) प्रकरणात दोन आरोपिंना अटक केली आहे. या दोनही आरोपींनी या हत्याकांडाबाबत चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. अंजली यांची अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंड प्रखर गुप्ताने पोलिसांसमोर मोठे खुलासे केले आहेत. अंजली बजाज यांच्या हत्येचे षडयंत्र त्याच्याच मुलीने रचल्याची माहिती प्रखऱ गुप्ताने दिली आहे. त्यामुळे मुलीनेच आईच्या हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा : Mira Road Murder: मृतदेहाचे अर्धे तुकडे केल्यानंतर मनोज का गेलेला ‘या’ दुकानात?
प्रेमात ठरली अडसर…
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली बजाज यांची मुलगी आणि प्रखर यांच्यात प्रेमसंबंध सुरु होते. मुलीच्या या प्रेमप्रकरणाची माहिती अंजलीला देखील होती.त्यामुळेच अंजली तिला प्रखरसोबत भेटून द्यायची नाही. याच कारणामुळे अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंडच्या मदतीने आईचा काटा काढण्याचा निर्णय़ घेतला होता. आणि त्यानुसार हत्येचा कट रचला.अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंड प्रखरने पैशाचे आमिष दाखवून गंजडुडवाराचा रहिवासी असलेल्या एका ओळखीच्या मित्राला या घटनेत सामील करून घेतले होते. त्यानंतर हत्येची संपू्र्ण योजना आखली.
8 जूनला प्रखर त्याचा मित्र शीलू आणि अंजली बजाजच्या अल्पवयीन मुलीने अंजली आणि वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून हत्याकांड घडवलं.यावेळी संधी पाहून प्रखऱ आणि शीलूने अंजली बजाज यांची हत्या केली आणि मृतदेह तेथेच सोडून पळ काढला. या हत्याकांडानंतर मुलगी वडिलांना फोन करून त्यांची दिशाभूल करत राहिली.