Badlapur Thane School case : 'फाशी... फाशी..' 7 तास बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर, एक इंचही मागे हटायला नाही तयार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

 badlapur thane school case protested demand to hang accuse 2 nursery kids sexually assaulted school parents block rail blockade badlapur crime news
तब्बल 7 तासापासून संतप्त नागरीकांनी ही रेल्वे वाहतूक रोखून धरली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन चिमुरडींच्या अत्याचाराप्रकरणी बदलापूरकर आक्रमक

point

सतंप्त जमावांनी रेल्वे वाहतूक धरली रोखून

point

सतंप्त आंदोलकांनी यावेळी आरोपीच्या फाशीची मागणी केली

Badlapur Thane School case Update:बदलापूरच्या एका शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी आज संतप्त जमावाने रेल्वे ट्रकवर उतरवून वाहतूक रोखून ठेवली होती. तब्बल 7 तासापासून संतप्त नागरीकांनी ही रेल्वे वाहतूक रोखून धरली आहे आणि ट्रॅकवरून सतत्प जमाव आरोपीला फाशी द्यावी अशा घोषणा करतायत. या प्रकरणात आरोपीला देण्यात येणाऱ्या शिक्षेचे ठोस आश्वासन मिळत नाही, तिथपर्यंत एक इंच देखील मागे न हटण्याचा निर्णय सतंप्त आंदोलकांनी घेतला आहे.  (badlapur thane school case protested demand to hang accuse 2 nursery kids sexually assaulted school parents block rail blockade badlapur crime news)

ADVERTISEMENT

दरम्यान सरकारच्या वतीने आंदोलकांशी बोलण्याशी संकटमोचक गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकात दाखल झाले आहेत. यावेळी आंदोलकांनी गिरीश महाजन यांच्यासमोरच आरोपीच्या फाशी...फाशीची घोषणा देऊन रेल्वे स्थानक दणाणून सोडलं. तसेच गिरीश महाजन यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव काही शांत होत नाही. याउलट सतंप्त आंदोलक फाशी फाशीच्या घोषणा देत आहे. 

गिरीश महाजन यांनी यावेळी कारवाई करताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली आहे. त्या पोलिसांना निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी आंदोलकांना दिले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांना निलंबित केलं आहे. या भागातील पीआयला देखील निलंबित केले आहे. तसेच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, असे गिरीश महाजन यांनी आंदोलकांना सांगत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वाचलं का?

 हे ही वाचा : Akola: बाई... हा काय प्रकार? बाजारात आलाय सिमेंटचा लसूण; फेरीवाल्याकडून महिलेची फसवणूक!

 बदलापूर अत्याचार प्रकरणात SIT स्थापण

 बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल माध्यमातून दिली आहे. 

 हे ही वाचा : Badlapur Crime: बदलापूरकरांनी रेल्वे रोखली नंतर 'ती' शाळाच फोडली, नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.   सदर प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. तसेच आरोपींना लवकर शिक्षा मिळावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी घेतले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT