प्रेमासाठी मुलीच्या तोंडातच पिस्तूल घातली, तरुणाच्या कृत्याने पोलिसही हादरले
मुलीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने प्रेमात कबुली मिळवण्यासाठी धक्कादायक पाऊल उचलले. त्याच्या त्या कृत्यामुळे घटना घडत असताना अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. मुलीच्या तोंडात पिस्तुलाची नळी कोंबून ट्रिगर दाबला गेला मात्र गोळी निघाली नसल्याने तिचा जीव वाचला आहे. त्या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी तरुणाची धुलाई केली आहे.
ADVERTISEMENT
Bihar Crime: एका मुलीच्या प्रेमात (Love Affairs) वेड्या झालेल्या एका युवकाच्या कृत्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कारण रस्त्याने जात असणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीला (Girl) थांबवून पिस्तुलाची नळी तिचया तोंडात कोंबली होती. कारण त्याला मुलीला ठार करायचे होते. तिच्या तोंडात पिस्तुलाची नळी कोंबून त्याने तीनदा गोळीबारही करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिला गोळी न लागल्याने तिचा जीव वाचला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
थोडक्यात जीव वाचला
बिहारच्या पटेलनगरमधील विद्यापीठात शिकणाऱ्या मुलीची हत्या करण्यासाठी एका तरुणाने पिस्तुलाची नळी तोंडात टाकून ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूलमधून गोळीबार होऊ न शकल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या दुकानदारांनी त्याच्याकडील पिस्तूल काढून मुलीला वाचवण्यात आले.
हे ही वाचा >> Datta Dalvi : थेट शिंदेंनाच ललकारलं, कोण आहेत बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक दत्ता दळवी?
केस ओढून रस्त्यावर पाडले
तरुणाच्या या कृत्यामुळे जमा झालेल्या नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक केली आहे. त्याच्याकडील पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सहारनपूर रोडवरील गुलाटी स्वीट शॉपसमोर बॉबी किचनजवळ एक मुलगी रेस्टॉरंटच्या बाहेर स्टूलवर बसली होती. त्यावेळी तिला मारण्यासाठी तरुणाने हे भयंकर कृत्य केले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तीन वेळा दाबला ट्रिगर
दुकानामध्ये साहित्य घेऊन आपल्या दुचाकीवरून निघून जातानाच प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने तिला अडवले. त्यावेळी तिला त्याने मारहाण करत त्याने तिचे केस ओढून तिला रस्त्यावरही पाडण्यात आले. त्यानंतर तिच्या अंगावर बसून पिस्तुलाची नळी त्याने तिच्या तोंडात कोंबलीय. त्यावेळी त्याने तीन वेळा पिस्तुलाचा ट्रिगर दाबला होता. मात्र गोळी निघाली नसल्याने तिला काहीही झाले नाही.
शुद्धीत आल्यानंतर अटक
हा घटना घडत असताना नागरिकांनाही धक्का बसला. मात्र काही नागरिकांनी पुढाकार घेऊन त्याच्या हातातील पिस्तूल काढून घेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीमुळे तो बेशुद्धही पडला होता. त्या अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याला शुद्ध आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Dhule News : धुळ्यात रीलबहाद्दर तरूणाला पोलिसांनी घडवली अद्दल, नेमकी काय शिक्षा दिली?
ADVERTISEMENT