आणखीण एक लिव्ह इन पार्टनर हत्याकांड, चाकूने 17 वेळा भोसकलं, मृतदेहाचे तुकडे अन्….

मुंबई तक

ADVERTISEMENT

boyfriend murder live in partner chops body acid remains walls killing spain incident
boyfriend murder live in partner chops body acid remains walls killing spain incident
social share
google news

देशात लिव्ह इन पार्टनरच्या (live in partner) हत्याकांडाच्या घटना वाढत चालल्या आहेत. नुकतंच मुंबईच्या मिरा रोडमध्ये (Mira Road) लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आरोपीने विकृतीचा कळस गाठत महिलेचे तुकडे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवरून कुत्र्याला खाऊ घातले होते. आरोपीच्या या कृत्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत देखील आरोपीने लिव्ह इन पार्टनरची 17 वेळा चाकूने भोसकून निघृण हत्या केली होती. या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे करून अॅसिड टाकलं आणि भिंतीत गाढून मृतदेह ठेवला होता. आता साधारण 9 वर्षानंतर हा संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. (boyfriend murder live in partner chops body acid remains walls killing spain incident)

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, स्पेनच्या (Spain) पोलिसांना 22 वर्षीय तरूणीचा बेपत्ता झाल्याच्या 9 वर्षानंतर मृतदेह सापडला होता. विशेष म्हणजे या तरूणीचा मृतदेह तिच्याच घरी आढळला होता.सिबोरा गगनी असे या तरूणीचे नाव होते. सिबोरा ही बॉयफ्रेंडपासून ब्रेकअप झाल्यानंतर अचानक गायब झाली होती. सिबोना बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिचा कसून तपास केला, मात्र त्यांच्या हाती काहिच लागले नव्हते. सिबोराचा तपासच लागत नसल्याने पोलिसांनी केसची फाईलच बंद केली होती.

हे ही वाचा : ‘घरी ये, मी एकटीच आहे’, मॅसेज मिळताच प्रियकर विवाहितेच्या घरी पोहोचला अन्…

दरम्यान एका दुसऱ्या महिलेच्या हत्याप्रकरणात आरोपीला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये त्याने सिबोराच्या हत्येची कबूली दिली होती. या आरोपीचे नाव मार्को गियाओ रोमीओ (45) असे होते. आरोपी रोमीओला ज्यावेळेस पोलिस ठाण्यात नेण्यात आले, त्यावेळेस त्याने सिबोराचा फोटो पोलिस स्टेशनमध्ये पाहिला होता.हा फोटो पाहून आरोपीने त्यांच्यासमोर सिबोराच्या हत्येची कबूली दिली. पोलिसांना सुरुवातीला या घटनेवर विश्वास बसला नाही. मात्र ज्यावेळेस आरोपीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला, आणि त्यानुसार तपास केल्यानंतर पोलिसांनाच हादरा बसला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी पॉलाच्या हत्येप्रकरणी रोमीओला 17 मे ला अटक केली होती. 28 वर्षीय पॉला ही इटलीची रहिवाशी आहे. पॉलाच्या घरी रोमिओला शिरताना आणि बाहेर पडताना पाहिले होते. रोमिओने पॉलावर 17 वेळा चाकूने भोसकून हत्या केली होती. तसेच रोमिओने पॉलाच्या हत्येची कबूली दिली नाही, मात्र सिबोराच्या हत्येची कबूली दिली होती.

7 जुलै 2004 साली सिबोरा बेपत्ता झाली होती. आरोपीने सिबोराचा मृतदेहावर अॅसिड टाकला आणि पेटीत मृतदेह टाकून चो भिंतीत गाडला होता. आरोपीने पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला. या तपासात पोलिसांना सिबोराचा मृतदेह घरातल्या भिंतीत सापडला होता. या भितीत एक पेटी होती. या पेटीतील एका प्लास्टीकच्य़ा पिशवीत सिबोनाचा मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mira Road Murder: ‘HIV पॉझिटिव्ह, शारीरिक संबंध…’ मनोज साने प्रचंड चाणाक्ष आरोपी!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT